भारतातील प्रसिद्ध गायक बी प्राक (B Praak) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तो आणि त्याची पत्नी मीरा बच्चन दुसऱ्यांदा आई-वडील होणार होते. पण जन्मादरम्यानच त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. गायकने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी शेअर केली आहे, ज्याने खरोखरच त्याच्या चाहत्यांची मनं मोडली आहेत.
बी प्राक याने बुधवारी (१५ जून) त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नोट शेअर केली. या नोटमध्ये लिहिले आहे की, “ अत्यंत दुःखाने सांगावे लागत आहे की, आमच्या नवजात बाळाचे जन्मादरम्यान निधन झाले आहे. पालक म्हणून आम्ही सर्वात दुःखद टप्प्यातून जात आहोत. आम्ही डॉक्टर आणि कर्मचारी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि पाठिंबा दिला. या नुकसानीमुळे आम्ही सर्वजण हादरलो आहोत आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कृपया आम्हाला यावेळी गोपनीयता द्या. मीरा आणि बी प्राक.” (b praak lost his new born baby during birth share emotional note)
बी प्राकने ४ एप्रिलला दुसऱ्यांदा वडील होणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने पत्नी मीरासोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते दोघेही काळ्या आणि पांढर्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करताना बीचवर एकमेकांसोबत पोझ देत होते. यादरम्यान त्याची पत्नी तिचा बेबी बंप दाखवत होती.
तसेच, बी प्राकने ४ एप्रिल २०१९ रोजी मीरा बच्चनशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव अदाब आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










