बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती


कलाकार त्यांच्या चित्रपटांमधून बक्कळ पैसे कमावतात. यासोबतच कलाकारांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात ज्यातून कलाकार पैसे कमावतात. याच पर्यायांपैकी एक महत्वाचा पर्याय म्हणजे जाहिराती. कलाकार विविध उत्पादनांच्या जाहिराती करत असतात. त्यांना या जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. कलाकार आणि ब्रँड्स यांच्यावर कलाकरांना मिळणारे मानधन ठरते. म्हणजेच जितका मोठा कलाकार आणि मोठा ब्रँड तितके कलाकारांचे उत्पन्न जास्त.

कलाकार आणि जाहिराती हे एकमेकांना पूरक आहे असे, म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कलाकरांना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत अधिक भर घालण्यासाठी देखील जाहिराती महत्वाच्या असतात. जवळपास सर्वच मोठे कलाकार मोठमोठ्या उत्पादनांच्या जाहिराती करताना आपण पाहतो. मुख्य म्हणजे जाहिरातींवरूनच कलाकारांची ब्रँड व्हॅल्यू समजते. जाहिरातींमधून मिळणार बक्कळ पैसा नेहमी कलाकारांना आकर्षित करतो. त्यामुळेच कलाकार देखील जाहिरातींना प्राधान्य देताना दिसतात. जाहिरातींवरून देखील कलाकार मीडियामध्ये चर्चेत असतात. आपण असे अनेक कलाकार पाहिले असतील ज्यांनी विविध कारणांमुळे मोठमोठ्या जाहिरातींना नकार दिला होता. जाहिरातींच्या बाबतीत बरेच कलाकार अपवाद देखील ठरतात.

मात्र, आज आम्ही तुम्हाला असा एक कलाकार सांगणार आहोत ज्याने मागील एक वर्षात एक- दोन नव्हे, तर तब्बल १५० कोटींच्या जाहिरातींना नकार दिला आहे. या कलाकाराचे नाव आहे ‘बाहुबली’ फेम प्रभास. होय प्रभासने गेल्या वर्षभरात कपड्यापासून इलेक्ट्रॉनिक,एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील मोठमोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी विचारणा झाली होती. मात्र, त्याने त्या सर्व जाहिराती नाकारल्या आहेत. बाहुबली चित्रपटामुळे दक्षिणेपुरता मर्यादित असणारा प्रभास देशासह विदेशातही पोहोचला. त्यामुळे कोणत्याही ब्रँड्सला प्रभासच्या नावाचा नक्कीच मोठा फायदा झाला असता.

प्रभास जाहिरातीच करत नाही असे नाही. मात्र प्रभास जाहिरातींच्या आणि ब्रँड्सच्या बाबतीत अतिशय निवडक ऑफरलाच पसंती देतो. जाहिरातींच्या ऑफर नाकारण्या मागे प्रभासकडे वेळ नाही, असे नाही तर तो सध्या ज्या स्थानावर आहे त्याची पूर्ण जाणीव त्याला आहे आणि यासाठी तो पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेवूनच जाहिराती आणि ब्रँड निवडतो.

प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगयचे झाले, तर तो लवकरच ‘राध्ये-श्याम’ या सिनेमातून झळकणार आहे. त्याचसोबत तो ‘सलार’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमातून वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या समोर येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.