Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुनमुन दत्तासोबत दवाखान्यात दिसला शाहरुख खान, काय आहे नेमकं प्रकरण

प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. प्रत्येक पात्राची कहाणी चाहत्यांना तोंडपाठ आठवते. कथांचा विचार केला, तर बबिता जी आणि जेठालालची अधुरी प्रेमकहाणी आपण कशी विसरू शकतो. पण सध्या बबिता जीचा आणखी एका व्यक्तीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाहरुख खानसोबत दिसली मुनमुन दत्ता
‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या फॅन पेजवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला आहे आणि मुनमुन दत्ता (Munmun Dutta) त्याच्या शेजारी नर्सच्या गेटअपमध्ये दिसत आहे. शाहरुख खानला पेशंटच्या भूमिकेत पाहून मुनमुन खूप खूश दिसत आहे. मुनमुनच्या चेहऱ्यावरचे हास्य स्पष्टपणे सांगते की, ती शाहरुखसोबत काम करताना किती आनंदी आहे. (babita ji of taarak mehta was seen in the hospital with shah rukh khan know what is the matter)

जाहिरातीमध्ये केलंय एकत्र काम
खरंतर ही पेनची जुनी जाहिरात आहे आणि त्यात दोघांनी एकत्र काम केलं आहे. या जाहिरातीत शाहरुख खानने रुग्णाची भूमिका साकारली होती आणि मुनमुन दत्ताने नर्सची भूमिका साकारली होती. पायाचे हाड तुटल्यामुळे शाहरुख बेडवर पडून आहे. मुनमुन किंग खानच्या पायाला लावलेल्या प्लास्टरवर पेनने सही करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘ऍड देखो’ नावाच्या यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे.

शो करतोय धमाल!
गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या शोची लोकप्रियता काळानुसार वाढतच चालली आहे. हा शो नेहमी Ormax Mediaच्या पॉवर रेटिंगमध्ये टॉप ३ मध्ये आपले स्थान निर्माण करतो.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा