कुस्तीपटू बबिता फोगाट कंगणाच्या ‘लॉकअप’मधून पडली बाहेर, चाहते निराश

सध्या कंगणा रणौतचा (Kangana Ranaut) रियॅलिटी शो ‘लॉक अप’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या वादाला खूप पसंती दिली जात आहे. यामध्ये स्पर्धक स्वत:शी संबंधित अनेक गुपिते उघडताना दिसत आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रविवारच्या एपिसोडमध्ये रेसलर बबिता फोगटला कंगनाच्या शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. कंगना रणौतने रविवारच्या एपिसोडमध्ये बबिताला एलिमिनेशनची माहिती दिली आहे. त्यामुळे आता बबिता फोगाटला कार्यक्रमातून बाहेर पडावे लागणार आहे. हा लोकप्रिय कार्यक्रम एमएक्स प्लेवर २४ तास पाहता येत असतो.

सध्या कंगना रणौतचा ‘लॉक अप’ कार्यक्रम सगळ्यांच्याच पसंतीस उतरताना दिसत आहे. कार्यक्रमात सहभागी असलेले सगळेच कलाकार धमाल उडवताना दिसत आहेत. कार्यक्रमात कुस्तीपटू बबिता फोगाटनेही सहभाग घेतला होता. मात्र आता तिला कार्यक्रमातुन बाहेर पडावे लागणार आहे. बबिताला कमी मते मिळाली होती, त्यामुळे तिला कार्यक्रम सोडावा लागणार आहे. यावर कंगनाने बबिताला हा खेळ नीट समजत नसल्याचे सांगितले आहे. कंगनाच्या बोलण्याला उत्तर देताना बबिता म्हणाली की, “मी खेळात माझे सर्वोत्तम दिले आणि कार्यक्रमाला जमेल तेवढे सहकार्य केले. होय, माझ्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. जर मी आज या शोमधून बाहेर पडले तर ती माझी कमतरता असेल आणि मी ते स्वीकारले आहेत.” असे स्पष्ट मत तिने व्यक्त केले आहे.

कंगनाने बबिताला सांगितले की, “तुला खेळ समजला, चांगला खेळलीस आणि आनंदही घेतला. पण, तुला तणाव सहन करावा लागला आणि यामुळेच कार्यक्रमात आमचे मनोरंजन झाले. आम्ही शोमध्ये पूर्णपणे सहभागी झालो की, आम्हाला त्याचा विजेता मिळेल. शोमध्ये तुमची चांगली साथ होती पण फक्त शारीरिकदृष्ट्या, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तू या कार्यक्रमात सामील नव्हतीस.” असे मत कंगनाने व्यक्त केले आहे.

दरम्यान शोमधून बाहेर पडल्यानंतर बबिता फोगटनेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ती म्हणाली की, “तुम्ही मला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. या आठवड्यात मी शोमधून बाहेर पडणार आहे, अशी शंका मला येत होती.”  तत्पुर्वी रविवारच्या एपिसोडमध्ये कंगनाने पायल रोहतगीला सांगितले की, “मी ठरवले आहे की, तुला लॉकअपमधून बाहेर काढायचे पण गेल्या काही दिवसांत तू तुझ्या खेळात सुधारणा केली आहेस. मी कायम नाही. पण या निर्णयावर मी माझ्या आवडी निवडीनुसार वर्चस्व गाजवू देणार नाही.” असा इशाराही तिने यावेळी दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post