Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड बेबो करतेय ‘गर्ल गँग’सोबत चीलआउट; पाहायला मिळाला करिश्मा अन् मलायकाचाही हॉट अंदाज

बेबो करतेय ‘गर्ल गँग’सोबत चीलआउट; पाहायला मिळाला करिश्मा अन् मलायकाचाही हॉट अंदाज

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने गर्ल गँग म्हणजेच बहीण करिश्मा, मलायका अरोरा आणि अमृता अरोरासह एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसून येत आहेत. हा फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘माय फॉरएव्हर गर्ल्स.’ इतकेच नव्हे तर करीना अनेकदा या मैत्रिणीसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसून आली आहे. (Bebo is doing Girl Gang doing Chillout, Photo posted)

त्याचबरोबर करीनाने अलीकडेच पती सैफ अली खानचा वाढदिवशी मालदीवमध्ये साजरा केला होता. त्यावेळी देखील ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिने तैमूर आणि जेह या दोन्ही मुलांसोबतचे फोटोही शेअर केले. त्याचबरोबर सुट्टीचा आनंद घेत असतानाचे फोटो देखील तिच्या अकाऊंटवरून व्हायरल झाले होते.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, करीना लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. यात तेलुगू अभिनेता नागा चैतन्य देखील एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. टॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. त्याचबरोबर करीना कपूरचा शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मिडीयम’ हा होता.

आमिर खान प्रॉडक्शन, वायकॉम १८ स्टुडिओ आणि पॅरामाउंट पिक्चर्स निर्मित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे श्रीनगर, लडाख, कारगिल, चंदीगड आणि इतर ठिकाणी शूटिंग पूर्ण केले गेले आहे. अदवित चंदन दिग्दर्शित हा चित्रपट १९९४ च्या अमेरिकन चित्रपट फॉरेस्ट गंपचे रूपांतर आहे. जे विन्स्टन ग्रूमच्या १९८६ च्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित होते. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर चाहते देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा