Wednesday, July 3, 2024

अक्षय कुमारने केला कोरोना काळातील दिवसांचा खुलासा, म्हणाला, ‘तेव्हा शूटिंग करणे खूप अवघड होते’

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस देखील आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. अशातच प्रमोशन दरम्यान अक्षय कुमारला काही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने संगीतले की, कोव्हीड दरम्यान शूटिंग करताना त्याला किती अडचणी आल्या आहेत.

अक्षय कुमार म्हणाला की, ‘जेव्हा पूर्ण लॉकडाऊन होते, तेव्हा अर्थातच मला घरी बसावे लागले आणि कोविड झाले तेव्हाही बसावे लागले. मात्र त्यानंतर सातत्याने काम केले. कोविड दरम्यान काम करण्याच्या वेळेबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला – ” यादरम्यान प्रोटोकॉल पाळावा लागला. यासोबतच थोडी भीतीही होती. माझे काम कोणतेही असो, मला अभिनेत्यासमोर यावेच लागते. बोलत असताना तो श्वास घेत आहे. तो माझ्यावर थुंकत आहे, मी त्याच्यावर थुंकत आहे. कोविडची अशी देवाणघेवाण होत होती. तो काळ खूप कठीण होता. पण जेव्हा काम करायचे असते तेव्हा काम करावे लागते. एकदा कोविड झाला आणि कोविडपासून दूर राहा ही देवाची मोठी कृपा आहे.”

पुढे अक्षय कुमार म्हणाला की, “कोविड दरम्यान अनेक गोष्टी चांगल्या झाल्या. पूर्वी लोकांना सॅनिटायझर म्हणजे काय हे माहीत नव्हते. पण आता लोक कोणाशी हस्तांदोलन करत असतील तर सॅनिटायझर वापरतात. स्वतःला स्वच्छ ठेवा. त्यावेळी हा बदल घडवून आणण्यात खूप अडचणी आल्या. पण आता फ्लॅशबॅकमध्ये गेलं तर मी म्हणेन की एवढा प्रॉब्लेम झाला नाही.”

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजीने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १८ मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे तर, क्रिती सेनन चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत आहे, ज्याला बच्चन पांडे नावाच्या खतरनाक गुंडावर चित्रपट बनवायचा आहे. याशिवाय रितेश देशमुख, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा आणि अभिमन्यू सिंह देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा