Tuesday, March 5, 2024

हेमा मालिनी यांच्यासमोर संजीव कुमार यांनी ठेवला होता लग्नाचा प्रस्ताव, मात्र ‘या’ अटीमुळे तुटले नाते

बॉलीवूडने त्याच्या एवढ्या मोठ्या इतिहासात अनेक खऱ्या जोड्या झालेल्या आणि तुटलेल्या पहिल्या. काही जोडयांना मीडियामध्ये लोकांमध्ये तुफान प्रसिद्धी मिळाली काही जोड्या लग्नाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेल्या तर काही जोड्या अचानक कायमच्याच तुटल्या. अगदी मधुबाला दिलीप कुमार यांच्या पासून ते दीपिका पदुकोण रणबीर कपूर यांच्या पर्यंत अनेक जोड्यांची नावे यात घेता येतील. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील एका अशा जोडीबद्दल सांगणार आहोत ज्या जोडीने खूप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. फॅन्सला देखील त्या जोडीला एकत्र पाहायचे होते, मात्र दुर्दैवाने ती जोडी तुटली आणि फॅन्सची मनं देखील.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार यांच्या अभिनयाचे आजही असंख्य चाहते आहेत. संजीव कुमार यांनी त्यांच्या दमदार आणि जिवंत अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तुफान नाव कमावले. त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. मात्र वयाच्या केवळ 47व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आजही त्यांचे सिनेमे बघताना त्यांची त्यांच्या अभिनयाची भुरळ प्रत्येक व्यक्तीवर पडल्याशिवाय राहत नाही. संजीव कुमार यांनी जेवढी लोकप्रियता त्यांच्या चित्रपटांमधून मिळाली तेवढीच त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे देखील गाजले. संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या नात्यांमुळे ते मीडियामध्ये तुफान चर्चेत होते. संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांनी सोबत ‘सीता आणि गीता’ या सिनेमात काम केले होते. यादरम्यान ते जवळ आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र काही काळातच ते वेगळे देखील झाले.

संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्या वेगळे होण्यासाठी लग्नाची अट कारणीभूत असल्याचे बोलले जाते. लेखक हनीफ जावेरी आणि सुमंत बत्रा यांनी संजीव कुमार यांच्या आत्मचरित्रात याबद्दल सांगितले आहे. सीता आणि गीता या सिनेमातील ‘हवा के साथ-साथ’ या गाण्याच्या शुटिंगवेळी हे दोघं जवळ आले. या गाण्याच्या शुटिंगवेळी डोंगरावरून खाली उतरत असताना दोघांसोबत एक अपघात झाला होता. दोघांना एकमेकांची जास्त चिंता असायची, तेव्हाच त्यांना प्रेमाची जाणीव झाली. हेमा आणि संजीव यांच्या नात्याला हेमा यांच्या आई यांनी देखील मंजुरी दिली होती.

हेमा नेहमीच संजीव कुमार यांच्या आईसमोर डोक्यावर पदर घेऊन त्यांचा नमस्कार करायच्या. 1991 साली हेमा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “संजीव यांना अतिशय विन्रम पत्नी पाहिजे होती. मात्र हेमा अशा अजिबात नव्हत्या. संजीव यांची इच्छा होती की, त्यांच्या पत्नीने घरी राहून आपल्या आईची सेवा करावी.” मात्र हेमा मालिनी अशा नव्हत्या याच कारणासाठी संजीव कुमार यांनी त्यांच्यासमोर ठेवलेला लग्नाचा प्रस्ताव त्यांनी नाकारला.

मीडियामधील माहितीनुसार संजीव कुमार त्यांच्या आईसोबत शांताबाईंसोबत खूप मिठाई घेऊन हेमा यांच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेले होते. हेमा मालिनी यांच्या आईदेखील हे पाहून खुश झाल्या. मात्र हेमा यांच्या आईंनी सांगितले की, “मला आनंद आहे की, तुम्ही हेमाला मागणी घालण्यासाठी आलात पण माझी एक अट आहे की लग्नानंतरही हेमा चित्रपटांमध्ये काम करेल.” ही अटच या नात्याचा शेवट ठरली. सुलक्षणा पंडित संजीव कुमार यांच्यावर खूप प्रेम करायच्या, मात्र संजीव यांनी त्यांचे प्रेम नाकारले आणि ते आजीवन अविवाहित राहिले. तर हेमा यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले.

हेही वाचा –
करिश्मा कपूरने साडीमध्ये केला कहर, वयाच्या 48 व्या वर्षीही दिसतेय हॉट!
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांना बिग बींच्या मुलाला बनवायचे होते जावई, पण ईशाने ‘या’ कारणामुळे दिला नकार

हे देखील वाचा