Thursday, March 19, 2026
Home कॅलेंडर मानसी नाईकची बॅचलर पार्टी पाहिलीत का? नसेल तर बघा, तुम्हीही म्हणाल हे भारी आहे राव!

मानसी नाईकची बॅचलर पार्टी पाहिलीत का? नसेल तर बघा, तुम्हीही म्हणाल हे भारी आहे राव!

‘बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या मराठीतील भन्नाट गाण्यांवर ठेका धरायला लावणारी अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच साखरपुडा झाला. आता लवकरच मानसी नाईक तिचा  बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सबत विवाह बंधनात अडकणार आहेत. जानेवारी महिन्यात या दोघांचे लग्न होणार आहे. सध्या त्यांच्या लग्ना्च्या चर्चा चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये चांगल्याचं रंगल्या आहेत. साखरपुडा संपन्न झाल्यानंतर मानसीच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी बॅचलर पार्टी आयोजित केली होती.

या बॅचलर पार्टीचे काही फोटो मानसीने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो शेयर करताना मानसीने लिहले की, ” मी माझ्या बहिणींशिवाय मिस्टरांसोबत लग्न करूच शकत नाही, जवळचे मित्रमैत्रिणी आयुष्याचा खरा खजिना आहे. कधी कधी ते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त चांगले ओळखतात, आपले अश्रू आणि हसू वाटून घेण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शनाची, पाठिंब्याची गरज असते तेव्हा ते नेहमी आपल्यासोबत असतात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना शोधणे खूप अवघड आहे. मात्र मी भाग्यवान आहे कारण मी दोन लोकांना शोधण्यात यशस्वी झाली आहे.” या हाऊस पार्टीमध्ये त्यांनी केक कापला. मानसी आणि तिच्या दोन मैत्रिणींनी एकसारखेच टी शर्ट घातले आहेत.

मानसी नाईकच्या या पोस्टला आणि तिच्या फोटोंना तिच्या फॅन्सकडून खूप लाईक्स मिळत आहेत. मानसीने एका मुलाखतीत सांगितले की, ती पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीचे मेहेंदी आणि संगीत सोहळयाचे कार्यक्रम १८ जानेवारीला होणार आहे. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीला होईल.

मानसी उत्तम मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तर प्रदीप हा एक इंटरनॅशनल बॉक्सर आहे.

हे देखील वाचा