Thursday, April 24, 2025
Home अन्य ‘बचपन का प्यार’ फेम सहदेव देखील भुलला पुष्पा सिनेमातील ‘श्रीवल्ली’ गाण्याला, हुक स्टेप करत केला धमाल डान्स

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव देखील भुलला पुष्पा सिनेमातील ‘श्रीवल्ली’ गाण्याला, हुक स्टेप करत केला धमाल डान्स

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने कमाईच्या बाबतीत आणि लोकप्रियतेच्या बाबतीत शिखर गाठले आहे. सिनेमातील संवाद, गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल आदी अनेक गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. सोशल मीडियावर यावर आधारित वेगवेगळे व्हिडिओ देखील व्हायरल होताना दररोज दिसत आहेत. कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वच लोकं या सिनेमाला भुलली असून, सिनेमाची क्रेझ तुफान वाढताना दिसत आहे. सिनेमाच्या गाण्यांनी तर लोकप्रियतेचे एक वेगळेच रेकॉर्ड केले आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ३०० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत २०२१ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटाचा मान मिळवला आहे. या सिनेमातील गाण्यावर रोज विविध लोकं गाण्याची हुक स्टेप करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता या गाण्यांनी ‘बसपन का प्यार’ फेम सहदेवला देखील भुरळ घातली आहे. त्याने त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, तो चांगलाच गाजत आहे.

‘बसपन का प्यार’ फेम सहदेवने पुष्पा सिनेमातील ‘श्रीविल्ली’ गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर सहदेवचा हा डान्स व्हिडिओ खूपच व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये तो गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सहदेव ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हिंदी व्हर्जनवर डान्स करत असून त्यावर तो हुक स्टेप करत आहे. त्याने अगदी अल्लू अर्जुन सारखाच सेम डान्स केला आहे. सहदेवने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “पुष्पा नाव ऐकून फ्लॉवर समजली का?….फायर आहे मी” (पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझी क्या?…. फायर है मैं’)

या व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून, ६७ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर अनेक लोकांनी त्यावर कमेंट्स करत सहदेवचा डान्स आवडल्याचे लिहिले आहे.

सहदेव ‘बचपन का प्यार’ गाणे गाऊन एका रात्रीत स्टार झाला होता. त्याची लोकप्रियता पाहून बादशाहने देखील त्याच्यासोबत एक गाणे केले होते. तर काही दिवसांपूर्वी सहदेवचा मोठा अपघात झाला होता. ज्यात तो खूपच गंभीर जखमी झाला होता. मात्र त्याला वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला होता. आता सहदेव उत्तम असून सोशल मीडियावर सक्रिय देखील झाला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा