Monday, May 13, 2024

…म्हणून लता मंगेशकर अविवाहित असूनही लावत होत्या कुंकू, गानकोकीळेच्या आयुष्यातील ‘त्या’ घटनेचा झाला खुलासा

आपल्या जादूई आवाजाने भारतीय संगीत जगताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या गायिकांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव घेतले जाते. ज्या आवाजाने तब्ब्ल 7 दशकांच्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केलेल्या लता दीदींनी वयाच्या 93 वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी सदैव आपल्याला त्यांची आठवण करून देतील. लता मंगेशकर यांनी संपूर्ण जगात हिंदी गाण्यांना ओळख मिळवून दिली, मात्र त्यांनी फक्त हिंदी नाही तर भारतातील अनेक प्रादेशिक भाषांमधील गाण्यांना जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रचंड गाजले.  त्यांच्या जवळच्या नायिका तब्बसुम यांनी त्या कपाळी कुंकू का लावायच्या याचा खुलासा केला होता.

40 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या तब्बसुम यांनी फक्त लता मंगेशकर (lata mangeshkar)यांच्यासोबत कामच केले नाही, तर त्यांना कायम त्यांचा सहवास लाभला. त्यासाठी त्या स्वतःला भाग्यवान समजतात. लता मंगेशकर आणि तब्बसुम यांचे खूप जवळचे संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांना माहीत होती.

लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात की, “लताजींबद्दल काही बोलणे म्हणजे सूर्याला उजेड दाखवल्यासारखे होईल, आयुष्यात मला बोलायला कधीही शब्दांची कमतरता भासली नाही; मात्र लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना मला नेहमीच शब्द कमी पडतात. जगातील जितके साहित्य आहे त्यामधील सगळ्यांचा संदर्भ घेऊन आपण लता दीदींच्याबद्दल बोलायला बसलो तरी ते पुरेसे ठरणार नाही, इतक्या त्या असामान्य व्यक्तिमत्व होत्या. अनेक काळ जातील, पिढ्या जातील नवीन गायिका येतील मात्र लता मंगेशकर यांची सर कुणालाही येणार नाही. त्या साक्षात सरस्वतीचे रूप होत्या” लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देताना तब्बसुम पुढे म्हणाल्या कि” 40 च्या दशकात त्यांनी गाणी गायला सुरुवात केली. त्याच काळात मीसुद्धा बाल कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी माझ्यासाठी अनेक गाणी गायली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे.”

लता दीदींची एक विशेष आठवण सांगताना तब्बसुम म्हणाल्या की, “आपल्या सर्वांना माहित आहे लता मंगेशकर विवाहित नाहीत. त्या कायम अविवाहित राहिल्या मात्र तरीही त्या आपल्या केसात कुंकू लावत होत्या. मी त्यांना एक भेटीत या संबंधित विचारले होते की, दीदी सगळ्यांना माहीत आहे तुम्ही अविवाहित आहात, मग हे कुंकू कोणासाठी लावता. त्यावेळी लता दीदींनी हसत हसत गालावर एक चापट मारली आणि लहानपणी मी जिला चॉकलेट देत होती ती मुलगी आता इतकी मोठी झाली की, माझ्या आयुष्यातील मोठ्या रहस्याचे उत्तर मागत आहे असे म्हणत या प्रश्नाचे उत्तर दिले होते. ”

यावेळी लता दीदी म्हणाल्या की, “बाळा संगीतच माझ्यासाठी सर्वकाही काही आहे. लोक म्हणतात ना पती परमेश्वर, तर माझा पती परमेश्वर देव सर्वकाही संगीत आहे आणि त्याच देवासाठी मी कुंकू लावते” लता मंगेशकर यांच्या या आठवणी सांगताना तब्बसुम खूपच भावूक झाल्या होत्या. लता मंगेशकर या असामान्य व्यक्ति होत्या अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.(tabssum talk about lata mangeshkars unknown story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा :
अभिनयाचा वारसा असूनही अभिषेक बच्चनला करावा लागला होता चित्रपटसृष्टीत संघर्ष, वाचा त्याची कहाणी

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या चर्चांमध्ये दुसऱ्याच अभिनेत्रीने उरकला लग्नसोहळा, पाहा व्हायरल फोटो

हे देखील वाचा