Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन ‘अनुपमा’ पासून ‘बडे अच्छे लगते है २ पर्यंत, यामुळे प्रेक्षकांनी फिरवलीय लोकप्रिय मालिकांकडे पाठ

‘अनुपमा’ पासून ‘बडे अच्छे लगते है २ पर्यंत, यामुळे प्रेक्षकांनी फिरवलीय लोकप्रिय मालिकांकडे पाठ

छोट्या पडद्यावरील टिव्ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडतात. अनेक रंजक कथा, कलाकार असलेल्या या मालिकांना प्रेक्षकांचा नेहमीच जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो. अशाही काही मालिका आहेत. ज्यांचा एकही भाग प्रेक्षक चुकवत नाहीत. स्टार प्लसवरील मालिका अनुपमा मालिकेने यावेळी टीआरपीच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्यासोबतच गम है किसी की प्यार में, बडे अच्छे लगते हैं 2 अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना खूप आवडल्या आहे. परंतु याच गाजलेल्या मालिकांमधील नव्या कथेला आणि नवीन ट्विस्टला प्रेक्षक चांगलेच कंटाळलेले दिसत आहेत. कोणत्या आहेत त्या मालिका ज्याच्या सध्याच्या कथेवर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत, चला जाणून घेऊ.

बडे अच्छे लगते है – नकुल मेहता आणि दिशा परमारचा शो बडे अच्छे लगते हैं 2 मधील रामची बहीण शिविनाचे निधन झाले आहे. यादरम्यान राम आणि प्रिया यांच्यात पुन्हा गैरसमज निर्माण झाला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा राम आणि प्रिया भेटायला लागतात तेव्हा निर्माते दोघांना वेगळे करणारा ट्रॅक घेऊन येतात. त्यानंतर राम आणि प्रिया यांच्यात गैरसमज निर्माण झाला, त्यामुळे चाहते या कथेवर नाराज झाले आहेत.

 उडारिया – ‘उडारिया’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडते. मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो. परंतु या मालिकेतील आगामी ट्विस्टमुळे चाहतेही नाराज आहेत. प्रथम फतेह आणि तेजो एकमेकांच्या आनंदासाठी दुसर्‍याशी लग्न करतात, त्यानंतर तेजोच्या लुकसारखी तान्या मालिक प्रवेश करते. आता तेजो परत आला आहे पण त्याची स्मृती निघून गेली आहे. दुसरीकडे, तान्या आता फतेहला जस्मिनसोबत लग्न करण्यासाठी तयार करत आहे. हा गोंधळलेला कथानक पाहून चाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

इमली – या मालिकेमध्ये इमली आणि आर्यनची केमिस्ट्री चांगलीच आवडली आहे. मालिका चांगल्या वळणावर असून सर्व काही व्यवस्थित सुरू असताना आता आर्यनची आई नर्मदा हिचे इमलीशी वागणे बदलले आहे. हे पाहून चाहते हैराण झाले आहेत. त्याच वेळी, मालिकेत खोटी आणि खरी प्रेग्नेंसीची कथा पाहून चाहते नाराज झाले आहेत.

अनुपमा – अनुज आणि अनुपमाच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. दोघांच्या लग्नाची चाहत्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली आहे. आता दोघांनी लग्न केल्याने मुल दत्तक घेण्याची कथा मालिकेमध्ये दाखवली जात आहे. आता अनुपमा आणि अनुज एक मुलगी दत्तक घेणार आहेत. हे वळण पाहिल्यानंतर चाहते खूपच नाराज झाले असून त्यांनी या कथेला नापसंती दर्शवली आहे.

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा