Wednesday, March 29, 2023

केकेने सलमान खानसाठी गायले अखेरचे गाणे, दबंग खानच्या ‘या’ सिनेमात ऐकायला मिळणार त्याचा शेवटचा आवाज

सिनेविश्वातील दिग्गज गायक केकेच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सर्वच लोकं स्तब्ध झाले आहेत. केकेच्या अशा अचानक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह फॅन्सला देखील मोठा धक्का बसला आहे. आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या देखील मनावर राज्य गाजवणाऱ्या केकेने एकापेक्षा एक सुंदर आणि सुरेख गाणी गात लोकांचे मनोरंजन केले. ३१ मे रोजी कोलकत्यामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने केकेचे निधन झाले. अजूनही लोकांना केकेच्या जाण्यावर विश्वास बसत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर केकेच्या आठवणींना उजाळा देण्याचे काम कलाकार आणि त्याचे फॅन्स करताना दिसत आहे. केकेच्या गाण्यांनी देखील त्याला श्रद्धांजली देण्याचे काम नेटकरी करताना दिसत आहे. आज ( २३ ऑगस्ट)  केकेची जयंती, जाणून घेऊया त्याच्या प्रवासाबद्दल. 

यातच आता मीडियामध्ये केकेच्या गाण्या संदर्भात अजून एक मोठी बातमी आली आहे. मीडियामध्ये दावा केला जात आहे की, सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ सिनेमात केकेने आवाज दिला आहे. या बातमीचा खरा स्रोत विकिपीडिया सांगितले जात आहे. जर ही बातमी खरी असेल तर त्याचे फॅन्स नक्कीच या सिनेमाची आता अधिक आतुरतेने वाट पाहणार यात शंका नाही. कारण हेच गाणे आता केकेचे फिचर सिनेमातील अखेरचे पार्श्वगायन असलेले गाणे ठरणार आहे. याआधी केकेने जेव्हा जेव्हा सलमान खानसाठी गाणी गायली ती हिटच झाली आहेत.

‘हम दिल दे चुके सनम’, ‘तड़प तड़प’, ‘तेरे नाम’ से ‘ओ जाना’, ‘रेडी’ सिनेमातील ‘हमको प्यार हुआ’, ‘एक था टाइगर’ सिनेमातील ‘लापता’, ‘बजरंगी भाईजान’ सिनेमातील ‘तू जो मिला’ आणि ‘ट्यूबलाइट’ सिनेमातील ‘मैं अगर’ आदी अनेक गाणी केकेने सलमान खानसाठी गायली आहेत. आता केकेचे शेवटचे गाणे देखील सलमान खानच्या सिनेमासाठीच असल्याने हे गाणे देखील सुपरहिट होईल यात शंका नाही.

तत्पूर्वी केकेवर मुंबईमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या अंतिम यात्रेमध्ये त्याच्या पत्नी आणि मुलांसोबतच कुटुंबातील इतर लोकं आणि कलाकारांचा समावेश होता. कोलकत्यावरून त्याचे पार्थिव शरीर मुंबईत आणले गेले. आज (२ जून) रोजी केकेवर मुंबईमध्ये विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी कोलकात्यामध्ये केलेला तोफांची सलामी देण्यात आली. त्यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
आयुष्यातील कोणत्याही परिस्थितीत गाण्यांमधून आपली साथ देणारा केके, वाचा त्याचा जीवनप्रवास
‘भारत के अग्निवीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, राज्यपालांच्या हस्ते झाले पोस्टरचे प्रकाशन
सुकेश चंद्रशेखर नंतर ‘या’ इटालियन अभिनेत्याच्या प्रेमात पडली जॅकलीन, व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा

हे देखील वाचा