टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात उद्यापासून म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२६ पासून होत आहे. या विश्वचषकाची सुरुवात दार वर्षीप्रमाणे भव्य उदघाटनाने होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक कलाकार देखील त्यांची उपस्थिती दाखवणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध रॅपर बादशाह तसेच डान्स आणि अभिनेत्री नोरा फाटेही यांचा देखील समावेश असणार आहे. कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण होणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-२० विश्वचषक उद्घाटन समारंभ कार्यक्रम असेल. सामन्यातील उपस्थितांना एका खास संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी देखील दिली जाईल. आयसीसीने जाहीर केले की लोकप्रिय रॅपर बादशाह आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही उद्घाटन समारंभात सादरीकरण करतील.
नोरा आणि बादशाह व्यतिरिक्त, नव-शास्त्रीय वादक ऋषभ रिखीराम शर्मा आणि दिग्गज तालवादक आनंदन शिवमणी हे देखील अधिकृत उद्घाटन समारंभात सादरीकरण करतील. त्यांच्या सादरीकरणाबद्दल उत्साहित, बादशाह यांनी एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, “क्रीडा, मनोरंजन आणि संस्कृतीच्या या जागतिक उत्सवाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. क्रिकेटसारखे संगीत लोकांना एकत्र आणते आणि मी या भव्य व्यासपीठावर पूर्ण उर्जेने सादरीकरण करण्यास उत्सुक आहे.”
ऋषभ रिखीराम शर्मा म्हणाले, “टी-२० विश्वचषकात सादरीकरण करणे हे मी कधीच कल्पनाही केली नव्हती, परंतु भारतीय संगीताला खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर घेऊन जाण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. या ऐतिहासिक क्षणी सादरीकरण करण्यास मी खूप उत्सुक आहे. हजारो लोकांसमोर शिवमणीसोबत स्टेज शेअर करणे मला अधिक सन्मानित करत आहे.” शिवमणी पुढे म्हणाले, “संगीत आणि क्रिकेट एक वैश्विक भाषा बोलतात. मुंबईत होणाऱ्या टी-२० उद्घाटन समारंभात सादरीकरण करणे हा सन्मान आहे. हा भारताच्या उर्जेचा आणि खेळावरील प्रेमाचा उत्सव आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










