कलाकारांच्या बाबतची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उतावळे असतात. त्यातही कलाकार आणि त्यांचे रिलेशनशिप स्टेटस हा मुद्दा फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर नेहमीच गाजताना दिसतो. अनेक कलाकार त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगासमोर न आणता ते फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवतात. मात्र, काही कलाकार हे त्यांच्या जीवनातील सर्वच लहान- मोठ्या गोष्टी जगासमोर आणत फॅन्ससोबत शेअर करतात.
छोट्या पडद्यावरील सर्वात लहान सुनेचा किताब मिळवणारी अभिनेत्री म्हणजे अविका गौर होय. ती देखील तिच्या सर्वच गोष्टी अगदी तिचे रिलेशनशिप स्टेटससुद्धा फॅन्ससोबत शेअर करते. नुकतेच अविकाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामुळे ती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. अविकाने तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा मिलिंदचा फोटो शेअर केला असून, यासोबत तिने एक रोमॅंटिक पोस्ट देखील लिहिली आहे.
अविका सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत मिलिंदसोबत काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या दोघांच्या नात्याला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाले असून, याबाबत त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून सांगितले आहे.
अविकाने मिलिंदसोबत तिचा फोटो शेअर करताना लिहिले, “या व्यक्तीला ओळखून आज मला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. तू मला आयुष्यातील सर्व आनंद दिला. मी खूप नशीबवान आहे की, तू माझ्यासोबत आहेस. मी वचन देते की, मी नेहमी तुझ्यासोबत राहील.”
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अविकाने सांगितले होते की, तिला कसा साथीदार पाहिजे, “मला नेहमी माझ्या आयुष्यामध्ये असा साथीदार पाहिजे होता, ज्याच्यावर मला अभिमान वाटेल. हेच कारण आहे ज्यामुळे मी आणि मिलिंद आज सोबत आहोत. आम्ही एकमेकांसोबत आमचे भविष्य देखील बघत आहोत. माझ्या मनाला माहित आहे की, हाच तो व्यक्ती आहे. त्यामुळेच मला याबद्दल बोलायला आणि त्याच्याबद्दल सर्वांशी शेअर करायला कोणतीही धाकधूक वाटत नाही.”
अविका आणि मिलिंद नेहमीच एकमेकांना पाठिंबा देताना दिसतात. एकमेकांना खास जाणवून देण्यात ते काहीच कसर सोडत नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’
-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’