Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीच्या आख्ख्या कुटुंंबाला झाली होती कोरोनाची लागण, अविका गौरने सांगितली आपबीती

कोरोना व्हायरसचा प्रकोप भारतात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. सामान्य व्यक्तींपासून ते मोठ- मोठ्या दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण या व्हायरसच्या तावडीत सापडत आहेत. या व्हायरससमुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. नुकतेच अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतून एक बातमी आली आहे की, ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौरच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती.

अभिनेत्रीने या संदर्भात सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहित माहिती दिली. तिने लिहिले की, “या काळात सर्वांनी पुढे येऊन एकमेकांना पाठिंबा द्या. कारण माझ्या कुटुंबानेही कोरोनाविरुद्ध लढा दिला आहे आणि त्यात विजयही मिळवला आहे.” तिने पुढे लिहिले की, “माझ्या कुटुंबाने या परिस्थितीचा सामना केला आहे. ही भावना मी कधीही विसरू शकत नाही. तो खूपच भयानक काळ होता. मला आनंद आहे की, ते यातून वाचले. मात्र, इतर कोणीही यामधून जावे असे मला वाटत नाही.”

यासोबतच तिने सर्वांना आवाहन केले आहे की, ज्यांनी कोव्हिड- १९ विरुद्ध विजय मिळवला आहे, त्यांनी पुढे यावे आणि प्लाझ्मा डोनेट करावा. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “हे त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी कोरोनाविरुद्ध विजय मिळवला आहे. कृपया प्लाझ्मा डोनेट करा. हे तुुमच्या शरीरातून खूप नाही घेत आणि रुग्णालयातही हे काढण्यासाठी सुरक्षितता बाळगली जात आहे. जेव्हाही तुमची वेळ येईल, तेव्हा लस नक्की घ्या. हे तुम्हाला कोरोनाच्या प्रभावापासून वाचवते.”

अभिनेत्री अविका ‘बालिका वधू’ मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. टीव्ही मालिकांमध्ये सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणून ‘बालिका वधू’ मालिकेचे नाव ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आले आहे. राजस्थानमधील बालविवाह सारख्या प्रथेवर आधारित या मालिकेने जबरदस्त लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये आनंदी (अविका गौर) आणि जग्या (अविनाश मुखर्जी) यांचे लग्न लहानपणीच होते. असे म्हटले जात आहे की, आता या मालिकेत नवीन पिढीतील कहाणी दाखवली जाईल.

विशेष म्हणजे अविकाने मालिकेतच नव्हे, तर चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात ‘इक्कादिक्की’, ‘सिनेमा चिकित्सा मावा’,’तेझ’ यांसारख्या बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दानशूर अजय देवगण धावून आला मराठी माणसांसाठी, शिवाजी पार्कमधील कोव्हिड आयसीयूला केली अशी मदत

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

-नुसता राडा…राडा! अल्लू अर्जुनच्या ‘बुट्टा बोम्मा’ गाण्याने मोडले इतर गाण्यांचे रेकॉर्ड; मिळाले तब्बल ५९ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा