दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनयाने आणि अंदाजाने नेहमीच दर्शकांना त्याच्याकडे आकर्षित केले आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटाला किंवा गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. अगदी बॉलिवूडमध्ये देखील लाखांमध्ये त्याचे चाहते आहेत. त्याच्या स्टाईलला त्याचे चाहतेच नाही, तर अगदी काही कलाकार देखील कॉपी करत असतात. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील नुकतेच ‘सिटी मार’ या गाण्यासाठी त्याचे आभार मानले आहेत. सध्या अल्लू अर्जुनचे एक थ्रोबॅक गाणे सगळीकडे व्हायरल होत आहे. या गाण्याचे नाव आहे ‘बुट्टा बोम्मा.’ या गाण्याने इतर गाण्यांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
अल्लू अर्जुनचे ‘बुट्टा बोम्मा’ हे गाणे सध्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच लावू शकता की, या गाण्याला 59 कोटी पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. या दोघांच्या जोडीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. ‘अरमान मलिक’ने हे गाणे गायले आहे. ‘थमन एस’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. त्याचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान गाजले आहे.
काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाचा टिझर रिलीझ झाला आहे. या टिझरला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. सगळे आता त्याच्या या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.
अल्लू अर्जुन एक नावाजलेला प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेता आहे. त्याच्या यशाचे गुपित ऍक्शन, कॉमेडी आणि रोमान्स आहे. यामुळेच संपूर्ण देशात त्याचे चाहते पसरलेले आहे. अल्लू अर्जुनने 2003 मध्ये ‘गंगोत्री’ या चित्रपटातून चित्रपटात प्रवेश केला होता. यानंतर त्याने एक नाही, तर अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. त्याने नंदी अवॉर्ड आणि फिल्मफेअर अवॉर्ड जिंकला आहे. त्याच्या कोणत्याही चित्रपटातील त्याचे पात्र त्याच्या चाहत्यांना खूपच आवडते. चाहते त्याचा चित्रपटात प्रदर्शित होण्याची नेहमीच वाट बघत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘लाज वाटत नाही का?’ म्हणत ‘बबिता- बबिता’ ओरडणाऱ्या प्रेक्षकांवर भडकले होते जेठालाल; पाहा व्हिडिओ