बेली डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही आपल्या दमदार अभिनयाने आणि डान्सने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. नोरा परदेशी असूनही तिने भारतीय लोकांच्या मनात खूप कमी वेळात स्थान मिळवले आहे. ती भारतासोबतच अनेक देशांमध्ये आपल्या डान्सने चाहत्यांवर भुरळ घालत असते. तिला नुकतंच बांगला देशामध्ये डान्स करण्यावरुन रोख लावली आहे. चला तर जाणून घेऊया की, नोराचा डन्स बघण्यासाठी वेडी असलेली लोक अचानक तिच्या डान्सवर रोख लावण्याचे कारण काय?
कॅनडामधून आलेली नोरा फतेही अनेक देशांमध्ये तिने आपल्या डान्सने लोकांची मने जिंकली आहेत. मात्र, बांगला देशामध्ये तिला डान्स करणयावरुन बंदी घालण्यात आली. नोराचा बांगलादेशामध्ये एक स्टेज शो होता ज्या ठिकाणी नोराचा डान्स होणार होता, पण बांगला देशातील सरकारने एक महत्तवाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे भारतातील कोणतेच कलाकार त्या भागाती कार्यक्रमाचा भाग बनू शकत नाही. बांगला देश सरकारने डॉलर वाचवण्यासाठी एक महत्तावाचा निर्णय घोषित केला आहे.
बांगला देशाच्या सांस्कृतिक व्यवहार मंत्रालयाने सोमवर ( दि. 17 ऑक्टोंबर ) दिवशी एक निर्णय जहिर करत सांगितले की, देशाची जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन, परकिय चलन व्यवस्था राखण्याच्या उद्द्शाने नोरा फतेही जी भारतीय चित्रपटात तिच्या कामासाठी ओळखली जोते तिला कार्यक्रमामध्ये डान्स करण्याची परवानगी रद्द करण्यात आली.
झाले असे की, वुमेन्स लीडरशिप कॉर्पोरेशनच्या एका कार्यक्रमामध्ये नोराला नृत्य पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे नोराचे हे आमंत्रण रंद्द करण्यात आले. बांगला देशाच्या मंत्रालयाने नोंदवले की, केंद्रीय बॅंकेचे डॉलर पेमेंटवरील निर्बंध कमी होत असताना 12 ऑटोंबरपर्यत परकीय चलनाचा साठा 36.33 अब्जपर्यंत घसरला आहे. एक वर्षापूर्वी केंद्रीय बॅंकेचा साठा 46.13 होता, त्यामुळे चार महिन्याची आयात करण्यासाठी पुरेसे होते.
आता भारतातील कोणतेच कलाकार बांगलादेशात कोणत्याच कार्यक्रमाचा भाग होऊ शकत नाही. सरकारच्या निर्णयामुळे नोरालाही आपल्या कार्यक्रमावर बंदी मिळाल्याच्या नोटिस थक्क केले आहे. IMDB वेबसाइडनुसार नोरा मोरक्कम- कॅनेडियन कुटुंबातील असून तिने 2014 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते’, अमोल कोल्हेंच्या पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव
स्वतःचं घर विकून डॉ. अमोल कोल्हेंनी केली होती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेची निर्मिती, वाचा त्यांचा जीवनप्रवास