बॉलिवूड संगीत क्षेत्राला एका मागून एक दुःखद धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच (६ फेब्रुवारी) रोजी गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. या दुःखातून कुठे सावरत नाही तर, बॉलिवूडमध्ये ‘डिस्को किंग’ अशी ज्यांची ओळख आहे त्या बप्पी लहरी यांचे निधन झाल्याचे वार्ता आली आहे. आपल्या करीअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिलेल्या बप्पी यांना सोन्याची देखील खूप आवड होती. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे. त्यांनी मागे किती तरी कोटीची संपत्ती मागे सोडली आहे. जाणून घेऊया त्यांनी एकूण संपत्ती किती आहे.
बप्पी लहरी (Bappi Lahiri) जिथे कुठे जातील तिथे अंगावर लाखो रुपयांचे सोने परिधान करून जायचे. बप्पी लहरी यांचे नाव ऐकताच सगळ्यांना आठवते ते त्यांचे सोने. त्यांच्याकडे ४० लाख रुपयांचे सोने होते. त्यांच्याकडे अजून ७५२ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी आहे. गायक असाण्यासोबतच ते एक चांगले राजनेते देखील होते. (Bappi da is owner of crores of assets there is only so much collection of gold and silver)
त्यांनी २०१४ साली लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ असणाऱ्या संपत्तीची माहिती दिली होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या कदे लाखो रुपयांचे सोने होते. या वर्षीच त्यांनी सोन्याचा कप प्लेट खरेदी केला होता. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्याकडे खूप सोने आहे. ते एकूण २० कोटी संपत्तीचे मालक आहे.
बप्पी लहरी यांना ज्याप्रमाणे सोन्याची आवड होती. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी चित्रानी हिला देखील सोन्या-चांदीचे खूप आवड होती. तिच्याकडे ९६७ ग्रॅम सोने आणि ८.९ किलो चांदी आहे. तसेच तिच्याकडे ४ लाख रुपयांचे हिरे देखील आहे. त्यांना गाड्यांपेक्षा सोन्याची जास्त आवड होती. त्यांनी सांगितले होते की, ते अमेरिकन रॉक स्टारप्रेसली यांचे खूप मोठे फॅन होते. ते देखील खूप सोने घालत होते. त्यांच्याकडून प्रभावित होऊनच बप्पीदा यांनी सोने घालण्यास सुरुवात केली होती. ते जेव्हा प्रेसलीच्या कॉन्सर्टला जायचे तेव्हा ते विचार करायचे की, ते जेव्हा यशस्वी होतील तेव्हा ते देखील असेच सोने घालतील आणि त्यांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण देखील केले.
बप्पी लहरी यांच्याकडे २०१४ मध्ये जेवढे सोने होते त्याची आज ३५ लाख १९६ रुपये एवढी किंमत आहे. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या चांदीची किंमत २ लाख ७५ हजार एवढी आहे.
हेही वाचा :