Friday, March 29, 2024

‘नात्यासाठी आम्हाला कागदाच्या तुकड्याची गरज नाही’, लग्नाबाबत अर्जुन रामपालचे मोठे वक्तव्य

बॉलिवूडमधील हॅण्डसम आणि चार्मिंग अभिनेत्यांच्या अर्जुन रामपाल याचा समावेश होतो. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने इंडस्ट्रीमध्ये खास जागा निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधी अर्जुन रामपालने मॉडेलिंगमध्ये त्याचे नाव कमावले आहे. अनेक मोठ्या चित्रपटात काम करून त्याने लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यापर्यंत तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याच्या पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर तो एका नवीन नात्यात अडकला. सध्या तो त्याची गर्लफ्रेंड गॅब्रीएला डेमेट्रीएड्ससोबत डेट करत आहे.

त्याला त्याच्या गर्लफ्रेंडपासून एक बाळ देखील आहे. परंतु त्या दोघांनी अजूनही लग्न केले नाही. अशातच नुकतेच दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याची गर्लफ्रेंड आणि मुलाबाबत वक्तव्य केले आहे. त्याने या मुलाखतीत सांगितले की, लग्न करण्याची त्याला काहीही गरज वाटत नाही. (Arjun rampal reacted on not marrying Gabriella said we do not need any piece of paper)

अर्जुन रामपालने (Arjun rampal) सांगितले की, “लग्न ही एक मोठी गोष्ट आहे. मला माहित आहे की, लोकं मला आणि माझ्या या निर्णयाला वेगवेगळ्या स्तरावर जज करणार आहेत.परंतु या सगळ्याची मी पर्वा करत नाही. मी माझ्या आयुष्यातील आनंद एन्जॉय करत आहे. यातच गॅब्रीएलासोबत लग्नाच्याबाबत प्रश्न विचारता अर्जुन रामपालने सांगितले की, त्यांनी आधीच लग्न केले आहे कारण त्याचे हृदय आता एक झाले आहे.

याबाबत अर्जुन रामपालने पुढे सांगितले की, “आमच्या नात्याला मान्यता देण्यासाठी आम्हाला कोणत्याही कागदाच्या तुकड्याची गरज नाही.” त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. त्याच्या या मुलींची नावे मायरा आणि माहिका ही आहेत.

अर्जुन रामपालच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो मागच्या वर्षी ‘नेलपॉलिश’ या चित्रपटात दिसला होता. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. सध्या तो कंगना रणौतसोबत ‘धाकड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो एजेंट अग्नी या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय दिव्या दत्ता ही अभिनेत्री देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खबरदार! अमिताभ बच्चन यांच्या परवानगीशिवाय त्यांचा आवाज, नाव किंवा चेहरा वापराल, तर होईल पंचायत

राणा दा अन् पाठक बाईचं लगीन, आज ‘या’ शहरात घेणार सात फेरे

हे देखील वाचा