Friday, July 5, 2024

बप्पी लहिरींनी ‘अशी’ केली होती संगीत क्षेत्रातील करीअरला सुरुवात, ‘डिस्को डान्सर’ गाण्याने बनले बॉलिवूडचे किंग

बॉलिवूड संगीत क्षेत्राला एका मागून एक दुःखद धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच (६ फेब्रुवारी) रोजी गान कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. या दुःखातून कुठे सावरत नाही तर, बॉलिवूडमध्ये ‘डिस्को किंग’ अशी ज्यांची ओळख आहे त्या बप्पी लहरी यांचे निधन झाल्याचे वार्ता आली आहे. आपल्या करीअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. बप्पी लहरी यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण संगीत क्षेत्रावर शोक काळा पसरली आहे.

गान कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन होऊन काही दिवस होताच संगीत क्षेत्राला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अनेकजण त्यांच्या या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी मुंबईमधील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. बप्पी यांना कोरोना झाला होता. त्यावेळी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. बप्पी यांना लहानपणापासून गायनाची खूप आवड होती. त्यांनी त्यांचे करीअर देखील संगीताचं केले. यासोबत अनेकांना माहीत असेल की, बप्पी यांना सोन्याची खूप आवड होती. (Bappi Lahiri death, let’s know about his career and life)

बप्पी लहरी यांचे खरे नाव अलोकेश लहरी हे होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अपरेश लहरी हे होते. तसेच आईचे नाव बन्सारी लहरी हे होते. बप्पी यांनी वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी तबला वाजविण्यास सुरुवात केली होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकल्या. त्यांनी पुढे जाऊन याचा ज्ञानाचा उपयोग करून संपूर्ण देशभरात त्यांचे नाव कमावले.

दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी छोट्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ८० च्या दशकात बॉलिवूडला अनेक सदाबहार गाणी दिली आहेत. त्यानंतर त्यांची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण झाली.

वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी संगीतकार बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यावेळी एस.डी .बर्मन हे त्यांचे प्रेरणा ठरले. ते बर्मन यांची गाणी ऐकायची आणि रियाज करायचे. या काळात लोकांना रोमँटिक गाणी ऐकायला आवडतील होते. त्यावेळी त्यांनी ‘डिस्को डान्सर’ हे गाणे श्रोत्यांच्या भेटीला आणले. त्यावेळी हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. आजही हे गाणे अनेकांच्या ओठावर आहे. त्यांना गाण्याची पहिली संधी बंगाली चित्रपट ‘दादू’ (१९७२) यामधून मिळाली होती. तसेच हिंदीमध्ये ‘शिकारी’ या चित्रपटातून त्यांना संगीत देण्याची संधी मिळाली होती. परंतु ‘जख्म’ या चित्रपटानंतर त्यांना त्यांची खरी ओळख मिळाले. त्यांनी या चित्रपटाला संगीत तसेच त्यांचा आवाज दिला होता.

या चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन सोडले आणि त्यानंतर बप्पी लहरी हे नाव सगळ्यांच्या ओठावर येऊ लागले. ते एक प्रसिद्ध गायक, संगीतकार तसेच रेकॉर्ड निर्माते देखील होते. त्यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहे.

त्यांनी ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘आय एम ए डिस्को डान्सर’, ‘जूबी जूबी’, ‘याद आ रहा है तेरा प्यार’, ‘यार बिना चैन कहा रे’, यांसारखी गाणी गायली आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा