Wednesday, July 3, 2024

संगीतकार बप्पीदांवर गुरुवारी होणार अंत्यसंस्कार, चाहते ‘या’ ठिकाणी घेऊ शकतात अंत्यदर्शन

प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांनी बुधवारी (१६ फेब्रुवारी) मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. आज बप्पीदा आपल्यात नसले तरीही त्यांचं सुमधूर संगीत कायमच आपल्यात राहील. बुधवारी निधन झालेल्या बप्पीदांवर मात्र गुरुवारी (१७ फेब्रुवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अंत्यविधीसाठी बप्पीदांच्या मुलाची वाट पाहिली जात आहे. त्यांचा मुलगा उद्या रात्री २ वाजता भारतात पोहोचणार आहे.

त्यांच्या मुलाला भारतात पोहोचण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरीच ठेवले जाणार आहे. याठिकाणी अनेक सेलिब्रिटी त्यांचे अंत्यदर्शन घेत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. (Bappi Lehiri Funeral Time)

कधी होऊ शकते फॅन्सला बप्पीदांचं दर्शन
बप्पीदांनी एकापेक्षा एक अशी तुफान हिट गाणी गायली आहेत. तसेच त्यांना संगीतही दिलं आहे. बप्पी लहिरी यांचा चाहतावर्ग अतिशय मोठा होता. याच फॅन्सला आपल्या लाडक्या संगीतकाराला शेवटचा निरोप द्यायचा आहे. याचमुळे चाहते त्यांचं अंतिम दर्शन विलेपार्ले येथे घेऊ शकतात. गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांचे पार्थिव १ तासासाठी अंतिम दर्शनासाठी ठेवणार आहेत. विलेपार्ले येथील स्मशान भूमीत चाहते हे दर्शन घेऊ शकतात.

गंभीर आजाराशी लढत होते बप्पी दा
बप्पीदांनी ६९व्या वयात शेवटचा श्वास घेतला. obstructive sleep apnea या गंभीर आजारामुळे ते अनेक दिवस त्रस्त होते. या आजाराशी ते बराच काळ लढत होते. काही माध्यमांतील वृत्तांनुसार, त्यांनी आपली मुलगी रीमाच्या हातात प्राण सोडले. यानंतर त्यांच्या परिवारासह सर्वजण शोक सागरात बुडाले. गेल्या वर्षी त्यांना कोरोना झाला होता. तेव्हापासून त्यांची तब्येत ठीक नव्हती.

हेही पाहा- सुपरस्टार्ससोबत काम करणारी आंचल सिंग एका वेबसीरिजमुळे आली चर्चेत। Who Is Anchal Singh

बप्पीदांबद्दल थोडक्यात
दिनांक १७ नोव्हेंबर, १९५७ रोजी पश्चिम बंगालच्या जलपैगुरी येथे बप्पी लहिरी यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात एक संगीतकार, गायक, संगीत निर्माते, राजकारणी व कलाकार अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. १९७२ सालापासून त्यांनी जवळपास ४८ वर्ष संगीत क्षेत्राची सेवा केली. त्यांनी हिंदीसोबत गुजराती, कन्नड, तेलुगू, तामिळ व बंगाली भाषेतही अनेक गाणी गायली व संगीतही दिले. ‘बागी ३’ मध्ये त्यांनी ‘भंकस’ या गाण्याला संगीत दिले होते. तसेच हे गाणे त्यांनी गायले देखील होते. हेच त्यांचे कारकिर्दीतील शेवटचे गीत ठरले.

हेही वाचा-

हे देखील वाचा