Tuesday, July 9, 2024

जेव्हा बप्पी लहिरी यांना पाहताच फिदा झाला होता मायकल जॅक्सन, वाचा संपूर्ण किस्सा

बॉलिवूड गायक बप्पी लहरी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांची गाणी आणि आठवणी नेहमीच आपल्यामध्ये त्यांना जिवंत ठेवणार आहे. त्यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी रात्री हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. ६८ वर्षीय बप्पी दा मागील अनेक दिवसापासून आजारी होते. बप्पी लहरींबाबत अनेक किस्से आपण ऐकले आहे. असाच एक किस्सा मायकल जॅक्सनसोबत घडला आहे. मायकल जॅक्सन जेव्हा पहिल्यांदा बप्पी यांना भेटला तेव्हा तो त्यांचा फॅन झाला होता. याचे कारण होते त्यांनी परिधान केलेले सोने. चला तर जाणून घेऊया नक्की काय होता तो किस्सा.

मायकल जॅक्सन एकदा मुंबईला आला होता. तेव्हा त्याची भेट बप्पी लहरी यांच्यासोबत झाली. या किस्साची माहिती स्वतः बप्पी लहरी यांनी कपिल शर्मा शोमध्ये दिली होती. त्यांनी सांगितले होते की, “जेव्हा तो मुंबईला आले होते, तेव्हा ते एका जागी बसून राहिले होते. त्यावेळी मायकल जॅक्सन त्याच्याजवळ गेला आणि त्याची नजर बप्पी यांनी घातलेल्या गणपतीच्या चैनवर पडली आणि तो हरवून केला. त्यावेळी तो म्हणाला की, “ओह माय गॉड, फॅन्टस्टिक. तुमचे नाव काय आहे? तुमची चैन कमाल आहे.” (Bappi Lahiri passed away intresting kissa with Michael Jackson gold chain)

बप्पी लहरी यांनी सांगितले की, त्यावेळी त्याने माझे नाव विचारले. यानंतर त्याने दुसरा प्रश्न विचारला की, तुम्ही कंपोसर आहात का? यावर बप्पी यांनी “हो‌ मी कंपोसार आहे,” असे उत्तर दिले. “मी डिस्को डान्सर हे गाणे बनवले आहे.’ त्यावेळी तो म्हणाला ‘”मला तुमचे जिम्मी जिम्मी वाले गाणे खूप आवडले.”

बप्पी लहरींनाबॉलिवूडचे गोल्डमॅन म्हटले जायचे. त्यांनी संगीत क्षेत्राल अनेक गाणी दिली आहेत. त्यांच्या गाण्यांना एक वेस्टर्न टच देखील असायचा ज्यामुळे सगळे त्यांच्या संगीताकडे खूप आकर्षित होते असतात. त्यांची डिस्को डान्सर आणि जिम्मी जिम्मी ही गाणी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत. यामुळे बॉलिवूडमधील अनेक गायक आणि कलाकार त्यांच्या गाण्यांवर फिदा असायचे.

हेही वाचा :

हे देखील वाचा