लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘ वादग्रस्त म्हणून ओळखला जात आहे. या कार्यक्रमामध्ये पहिल्याच भागापासून अनेक वाद पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम नेहमी प्रमाने खूपच चर्चेत आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये जेवणाचा तुटवडा पडला आहे, त्यामुळे स्पर्धकांमध्ये चांगलेच भांडण पेटताना दिसले. यानंतर घरामध्ये अचानकच बदलत्या नियमामुळे देखिल स्पर्धकांना खूपच कठीण परिस्थितितीचा सामना करावा लागत आहे. सोमवार (दि.10 ऑक्टोंबर) दिवशी प्रसारित झालेल्या भागामध्ये निमरित कौरची कॅप्टनसी देखिल धोक्यात आल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये घरामध्ये जेवणाचा तुटवडा पडल्याचे दिसून आले. काही स्पर्धकांचे जेवणामुळे चांगलेच वदही पेटले होते. नुकत्याच झालेल्या भागामध्ये अर्चना गौतम (Archana Gautam) आणि शालीन भनोट (Shalin Bhanot)यांच्यामध्ये चिकनसाठी भांडण पेटले होते. शालिन आपल्या मेडिकलचा कंडीशनचा फायदा घेत चिकनवर आपला हक्क गाजवत होता तर, दुसरीकडे अर्चनानेही आपले मत मांडत पुर्ण चिकन त्यालाच का द्याचे असे बोलत होती त्यामुळे या दोघांमध्ये एवढा वाद पेटला की, शालिनने अर्चनाला जाहिल असे बोलून टाकले.यानंतर अर्चनानेही शालिनला अपशब्द बोलून टाकले होते.घरामध्ये
घरामध्ये असे वातावरण पाहून बिग बॉसने सगळ्या स्पर्धकांसाठी आलार्म वाजवला. घरामध्ये सतत होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे चांगलीच फटकारही लावली होती. घरामध्ये पसरलेल्या घाणीमुळे देखिल सगळ्यांनाच जोरदार फटकार लवली आणि घराची कप्तान निमरित कौर (Nimrit Kaur) हिला कप्तानच्या पदावरुन काढण्यात आले. त्यासोबतच घराच्या नवीन कप्तानसाठी शिव ठाकरे आणि गौतम या दोघांमध्ये कप्तानसाठी चांगलीच स्पर्धा झाली. या टास्कमध्ये शिव आणि गौतम यांच्या डोक्यावर टप ठेवले होते. घरामधील स्पर्धक त्या टपमध्ये भार वाढवत होते. हा टास्क करत असताना काही स्पर्धकांमध्ये चागलेच भांडणही पेटले होते. भांडण एवढ्यावरच थांबले नाही, तर टास्क करत असताना शालिनने अर्चनाला धक्का दिल्यामुळे घरामध्ये चांगलाच वादही पेटला. त्यामुळे शालिनला असा वर्तणुकीमुळे बिग बॉसने कडक शिक्षाही दिली. झालेल्या टास्कचे संचालन पुर्व कप्तान निमरित करत असल्यामुळे तिने शिवला चिटिंग करत असल्यामुळे तिने त्याला टास्कमधून काढून टाकले आणि गौतम घराचा नवीन कप्तान म्हणून घोषित केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चनच्या ‘या’ चित्रपटासाठी लागली होती मैल मैलांची रांग, चाहत्यांनी वेडे होऊन केली होती गर्दी
‘छोटो मियाँ बडे मियाँ’च्या वेळी अमिताभ बच्चनला खूप घाबरला होता गोविंदा, कारण जाणून व्हाल थक्