Wednesday, March 29, 2023

टीना अन् अर्चनाच्या भांडणात अडकला ‘हा’ अभिनेता, त्याचे हाल पाहून तुम्हीही लावाल डोक्याला हात

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त कार्यक्रम पहिल्यातच भागापासून खूपच चर्चेत आहे. यामध्ये अनेक दमदार कलारांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टीवरुन चांगलेच वाद पेटताना दिसत आहेत. या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. लोक खूपच आवडीने हा कार्यक्रम पाहात आहेत. गुरुवार (दि. 6 ऑक्टोंबर) दिवशी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये खूपच जास्त वाद झाल्याचे दाखवले आहे.

नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये अभिनेत्री टीना दत्त (Tina Dutt) आणि अर्चना गौतम (Archana Gautam) या दोघींमध्ये मांजरीनी सारखे भांडण पाहायला मिळेले होते. या दोघींच्या भांडणामध्ये तिसराच स्पर्धक बळीचा बकरा ठरला. म्हणजेच या दोघींचे भांडण सोडवत असताना गौतम विग ( Gautam vig) यांची भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा सगळेच भाडण त्याच्या उराशी आले. या वादाचे कारण म्हणजे कैप्टनसीच्या टास्कनंतर या दोघींचा चांगलाच वाद पेटला आणि या दोघींच्यामध्ये पडल्यामुळे गौतमतचे चांगलेच हाल झाले.

अर्चनासोबत झालेल्यावादानंतर टीना अभिनेता गौतमला आपल्यासोबत घेऊन जात होती तेव्हा दुसरीकडे अर्चनादेखिल गौतमला टीनासोबत जाण्यास अडवत होती. दोघींच्यामध्ये अडकलेला हा कालाकार त्याला कळतच नव्हते की, त्याने कोणासोबत जावे. त्यामुळे तो ऊठून मध्ये पडलेल्या खुर्चीवर जाऊन बसला त्यामुळे गौतमची अशी वर्तूवणूक पाहून टीना अभिनेत्याशी नाराज होऊन त्याच्यासोबत कधीच बोलणार नाही अशी शप्पत खाताना दिसली. दुसरीकडे अर्चनानेही गौतमला चमचा म्हणत तिनेही बजावून सांगितले की, “आजपासून अशी चमचागीरी करायची नाही.”

त्यासोबतच घरामध्ये अजून एक ट्विस्ट आला आहे. कारण म्हणजे बिग बॉसच्या सतत होणाऱ्या उल्लंघनामुळे बिग बॉस खूपच नाराज झाले आहेत. त्यामुळे खराची कैप्टन निमरित कौर हील चांगलीच फटकार लावली असून तिच्या कैप्टनसी देखिल धोक्यात आली होती. मात्र, बिग बॉसने तिली कॅप्टनसी वाचवण्याची एक संधी दिली. नंतर शालीनी भनोट आणि निमरित यांच्यात एक टास्क झाला होता, यामध्ये निमरितने आपली टास्क पूर्ण करत आपल्या कॅप्टनसीला जाण्यापासून वाचवले. आता पुढच्या भागात हे पाहाने खूपच रोमाचक अलेस की, गौतम रुसवा काढण्यासाठी कोणत्या अभिनेत्रीकडे जाणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वेस्टर्न लूकमध्ये मौनीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा
दिवंगत अभिनेते अरुण बालींचा जुना व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

हे देखील वाचा