Saturday, April 19, 2025
Home साऊथ सिनेमा शालिनला धक्का देणं पडलं महागात, बिग बॉसने दोन आठवड्यांसाठी दिली ‘ही’ शिक्षा

शालिनला धक्का देणं पडलं महागात, बिग बॉसने दोन आठवड्यांसाठी दिली ‘ही’ शिक्षा

सगळ्यात जास्त वादग्रस्त आणि लोप्रिय कार्यक्रम असणारा ‘बिग बॉस‘ हा कार्यक्रम सध्या खूपच चर्चेत आहे. पहिल्याच भागापासून होणारा वाद आणि आता दोन हप्ते पूर्ण झाले असून होणाऱ्या वादामध्ये चढ उतार पाहायला मिळाले. मात्र , काही स्पर्धकांच्या वादाने घराचे वातावरणच बिघडून टाकले होते. सध्या घरामध्ये जेवणाचा तुटवडा पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शालिन भनोट आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये जोरदार भांडण होताना दिसून आले. सोमवार ( दि. 10 ऑक्टोंबर) दिवशी प्रसारित झालेल्या भागामध्ये प्रेक्षकांना चांगलेच वाद पेटताना दिसून आले.

सध्या घरामध्ये जोेवणामुळे वाद पेटताना दिसून येत आहेत. गेल्या हप्त्यामध्ये इमली फेम सुंबुल तौकीर (sumbul touqeer) हिने जेवणामध्ये भात न मिळाल्यामुळे पूर्ण घराला डोक्यावर उचलले होते. त्यामुळे तिने घरामध्ये चांगलाच राडा घातला होता. तिने सगळ्यांनाच भांडून भुस्काट पाडले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा तसाच वाद शालिन आणि अर्चनामध्ये पेटताना दिसला होता. सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागामध्ये या दोघांनी चांगलाच राडा घातलेला दिसून येत आहे. झाले असे की, शालिनला मेडिकलचा प्रॉब्लेम असल्यामुळे तो सतत चिकनवर हात मारत असतो मात्र, यावेळेस अर्चना गौतम (Archana Gautam) हिने त्याला ठाम बजावून सांगितले की, चिकन सगळ्यांनाच मिळाले पाहिजे. त्यांच्या वाद एवढा पेटला की, दोघांनीही एकमेकांना अपशब्दाचा वापर केला.

त्यानंतर घरामध्ये सतत होणाऱ्या निमांच्या उल्लंघनामुळे बिग बॉसने निमरित कौर (Nimrit Kaur) हिला कॅप्टनसीच्या पदावरुन काढून टाकले. घराच्या नवीन कॅप्टनसाठी एक टास्क ठेवण्यात आला होता ज्यामध्ये शिव ठाकरे आणि गौतम विग (Gautam Vig) या दोन अभिनेत्यांना निवडले होते. या टास्कमध्ये या दोघांच्या डोक्यावर एक टप ठेवला होता ज्यामध्ये सामान टाकून टपचा भार वाढवायचा होता. मात्र, बिग बॉसच्या घरातील एकही वस्तू यामध्ये वारता योणार नाही. फक्त आपल्या वैयक्ताक वस्तुंचाच वापर करुनच हा टास्क पुर्ण करायचा. मात्र, तरिही शालिन भनोट (Shalin Bhanot) बिग बॉसने दिलेल्या बॅगेचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा अर्चना त्याला अडवत असते. त्यामुळे या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटतो.

अर्चना आणि शालिन यांचा वाद एवढा पेटतो की, भांडणातमध्ये शालिन रागामध्ये अर्चनाला जोरात धक्का मारतो आणि ती पडते. त्यामुळे घरामध्ये खूपच खळबळ माजते. अर्चनाने शालिनवर मारहान करण्याचा आरोप करते, तर बाकीचे सदस्य शालिनची अशी वर्तवणूक पाहून त्याच्यावर नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे साजिद खान आणि एमसी स्टॅन हे दोघेही शालिनवर नाराजी व्यक्त करत त्याला ऐकवतात. या सगळ्या गोष्टाचा बिग बॉस आढावा घेतात आणि बिग बॉसच्या घरातील नवीन कप्तान गौतम याला घडलेल्या घटनावर जबाबदारी देतात की, शालिन खरच दोषी आहे का नाही हे शोधून काढ.

बिग बॉसच्या निमाचे पालन करत गौतम सगळ्या सदस्यांना आपले विचार व्यक्त करत सगळ्यांना आपले मत विचारतो. त्यावर 5 ,सदस्यांनी यावर मत मांडत सांगितले की, शालिनने अर्चनाला धक्का दिला आहे. यावर गौतम बिग बॉसला आपला निर्णय सांगत म्हणतो की, “या घडलेल्या घटनामध्ये शालिन दोषी आहे. त्याने घरातील सगळ्यात महत्तवाच्या निमाचे उल्लंघन केले आहे. तो घरामध्ये राहाण्याच्या लायकीचा नाही.” यानंतर बिग बॉसने पुन्हा एकदा फोटेज चेक करुन सांगितले की, शालिनने मुद्दाम अर्चनाला धक्का मारला नाही. त्याच्याकडून चुकिने असे घडले. पण जर घरातील कॅप्टनला असे वाटत असेल की, शालिन दोषी आहे. तर त्याला पुर्ण सिजनमध्ये घराचा कप्तान बणन्याची संधी मिळणार नाही. सोबतच नियम तोडल्यामुळे शालिनला 2 हप्ते नॉमिनेट केले जात आहे. बिग बॉसचा नियम ऐकूण शालिन खूपच चिडतो आणि म्हणतो की मी या घरामध्ये स्वत:ला सुरक्षित वात नाही आणि मग घरामध्ये खूपच खळबळ माजते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! ‘छेलो शो’ फेम बालकलाकाराचं वयाच्या 10 व्या वर्षी कर्करोगाने निधन
चिंता कशाची! उर्फी पॅपराजीला म्हणाली, ‘माझ्या आयुष्याच…’

हे देखील वाचा