Wednesday, March 29, 2023

बिग बाॅसच्या स्पर्धकांना पहिल्याच दिवशी बसला माेठा धक्का, वर्षानुवर्षे चालत आलेला ‘हा’ नियम माेडला

छाेट्या पडद्यावरील प्रसिद्ध पण तितकाच वादग्रस्त असलेला शो म्हणजेच ‘ बिग बॉसचा सीझन 16 ‘ सुरू झाला आहे. यंदाच्या शोची थीम आणि स्पर्धकांमुळे चाहते ‘बिग बॉस 16’ पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक गाेष्ट अशी आहे जी या सीजनमध्ये नाही, त्यामुळे जुना नियम माेडला, अशी चर्चा सुरु झालीये. या कार्यक्रमाचा पहिला भाग शनिवारी (दिनांक 1 ऑक्टाेबर) कलर्स टीव्हीवर प्रसारित झाला. त्यावेळी प्रेक्षकांना शोमध्ये प्रचंड बदल पाहायला मिळाले.

बिग बॉस 16(Bigg Boss 16) यावेळी वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रिटींची  झाेप उडवणार आहे. सर्व खेळाडूंनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि 2 ऑक्टोबरला त्यांचा पहिला दिवस शोमध्ये दाखवला गेला. ज्याचा एक प्रोमो (Bigg Boss Promo) व्हायरल होत आहे.

बिग बॉस 16 मध्ये 15 वर्षे जुना नियम मोडला…

प्रोमोमध्ये दिसून येते आहे की, पहिल्याच दिवशी शोच्या खेळाडूंना मोठा झटका बसला आहे. शोमध्ये आता वेकअप गाणे वाजणार नाही. आगामी एपिसोडमध्ये सर्व स्पर्धक सकाळच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. मात्र, त्यांना हे कुठे माहित असते की, शाेमध्ये त्यांच्यासाठी हे पहिले आणि शेवटचे गाणं आहे. शाेमध्ये स्पर्धकांना उठण्यासाठी गाणे वाजवले जात असे, परंतू आता शाेमध्ये 15 वर्षे जुना नियम मोडला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या स्पर्धकांचा शाेमध्ये समावेश…

यंदा बिग बॉसच्या घरात एकापेक्षा एक स्पर्धक आले आहेत. शोचा पहिला स्पर्धक अब्दु रोजिक आहे, तर शेवटचा स्पर्धक साजिद खान. इतर स्पर्धकांमध्ये टीना दत्ता, गोरी नागोरी, सुंबुल तौकीर, मन्या सिंग, शिव थरके, सौंदर्या शर्मा, शालीन भानोत, गौतम विज, अर्चना गौतम, एमसी स्टेन, अंकित गुप्ता, प्रियंका चहर चौधरी, अब्दू रोजिक आणि निम्रत कौर सिंग यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
बॅकलेस चोळीत सपनाने पहिल्यांदाच दाखवला टॅटू, अफलातून ठुमक्यांनी माजवली खळबळ
बिग बॉसमध्ये एन्ट्री करणाऱ्या साजिदचे वादाशी घनिष्ठ संबंध, 15 वर्षांच्या वयात केली होती जेलवारी

हे देखील वाचा