Monday, July 1, 2024

‘कर्नाटक क्वीन’ ते ‘नॅशनल क्रश’ असा होता रश्मिका मंदानाचा सिनेसृष्टीतील प्रवास

“क्लीन अँड क्लिअर, टाइम्स फ्रेश फेस ऑफ इंडिया 2014” चे विजेतेपद जिंकलेली आणि “कर्नाटक क्रश” म्हणून  मीडियामधे प्रसिद्ध असलेली रश्मिका मंदाना ही एक दाक्षिणात्त्य अभिनेत्री आणि मॉडेल आहे, जी प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. तेलुगु आणि कन्नड सिनेमांमधील सर्वाधिक फी घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मंदाना हिचे नाव आहे. अशा अभिनेत्रीचा आज वाढदिवस.

रश्मिका मंदाना हिचा जन्म 5 एप्रिल 1996 ला कर्नाटकच्या कोडागु जिल्ह्यातील “विराजपेट” या गावी झाला. पीएसई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पूर्व-विद्यापीठ अभ्यासक्रम घेण्यापूर्वी तिचे शिक्षण कुर्ग पब्लिक स्कूलमध्ये झाले. अभ्यासातदेखील ती हुशार होती. अभिनय करत असताना  आपल्या  शालेय  शिक्षणाकडे तिने  कधीच दुर्लक्ष केले  नाही.  तिने “रमैया कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय” मधून “मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात बी.ए.” केले आहे.

केवळ 10 चित्रपटातून तिने आपल्या उत्त्तम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले. याचमुळे तिला ‘नॅशनल  क्रश’ म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले आहे. रश्मिका ही आपल्या चित्रपटामुळे तर प्रसिद्ध झालीच, परंतु तिचे सोशल मीडियावर शेअर केलेले एक्स्प्रेशन व्हिडिओ सुद्धा, मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. तिच्या याच एक्स्प्रेशनमुळे तिला “एक्स्प्रेशन क्वीन” म्हणूनही ओळखले जाते.

रश्मिकाला लहानपणापासूनच अभिनयाची फार आवड आहे. ती लहानपणी टीव्ही समोर बसून अभिनय करायची. तिने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मॉडेलिंगला सुरुवात केली. तिच्या सौन्दर्याकडे बघून तिला काही जाहिरातींच्या ऑफर्स येत होत्या. तिने “क्लीन अँड क्लिअर टाइम्स फ्रेश फेस ऑफ इंडिया 2014” चे विजेतेपद जिंकले आणि तिला “क्लीन अँड क्लिअरची” ब्रँड अम्बॅसॅडर बनवलं गेलं. तिने “ ला मोड बेंगलोर टॉप मॉडेल” स्पर्धेमध्ये भाग घेतला, तिथे तिने TVC ‘किताब जिंकला. मग  तिचे फोटो  मीडियामध्ये झळकले, आणि तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

कन्नड डायरेक्टर रिषभ शेट्टी यांना तिचे फोटो फार आवडले. त्यांनी रश्मिकाला ऑडिशनसाठी बोलावले. तिला हे सगळे स्वप्नवत होते. रश्मीकाने ऑडिशन दिली, आणि तिचे चित्रपटासाठी सिलेक्शन झाले. क्रिक पार्टी (2016) हा तिचा पहिला चित्रपट. 4 करोड बजेटच्या या चित्रपटाने 50 करोडचा बिझनेस केला, आणि बॉक्स ऑफिसवर धमाल उडवली. कर्नाटकच्या मुख्य चित्रपटगृहात क्रिक पार्टी चित्रपटाने 250- दिवस पूर्ण केले.

रश्मिकाच क्रिक पार्टी या चित्रपटातील “सानवी” या भूमिकेसाठी कौतुक झाले. टाइम्स ऑफ इंडियाच्या लेखिका सुनयना सुरेश म्हणतात की, “कॉलेजमधील सानवी म्हणून, रश्मिका मंदाना ही सहज काम करणारी मुलगी आहे, आणि तिने प्रेक्षकांचा श्वास रोखला आहे.”  द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या चित्रपटाच्या समीक्षकाने लिहिले की, ” रश्मिका मंदाना चित्रपटात मुख्य पात्रांसह आऊटसनमध्ये आहे.” डेक्कन क्रॉनिकलच्या शशिप्रसादने नमूद केले की ” रश्मिका मंदाना यांनी साकारलेली सुंदर सानवी, तिचे महाविद्यालयीन काळापासूनचे सुंदर आणि गोंडस चित्रण हे, सर्व लोकांना त्यांच्या अविस्मरणीय क्रशची आठवण करून देईल.” यामुळे तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी 2017 चा SIIMA (दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार) पुरस्कार मिळाला. ती 2016 च्या ‘बेंगळुरू टाइम्स च्या’ 25 मोस्ट डेसियारेबल वूमन स्पर्धेमधे ती24 वी होती.

सन 2016 मध्ये रश्मिकाची क्रिक पार्टीच्या निमित्ताने रक्षित शेट्टीशी प्रथमच भेट झाली. एकत्र काम करून त्यांनी डेटिंग करण्यास सुरवात केली. जुलै 2017 मध्ये त्यांचे मूळ गाव विराजपेट येथील एका खासगी समारंभात त्यांचा साखरपुडा झाला होता. या जोडप्याने सप्टेंबर 2018 मध्ये आपला साखरपुडा परस्पर सहमतीने तोडला.

नंतर तिचे अंजनी पुत्र (2017), चमक (2017), हे चित्रपट आले , पण त्यांनी काही खास बिजनेस केला नाही. करिअर डगमगत आहे असं वाटत असताना, तिचा तेलगू चित्रपट “चलो ” (2018),  या 3 करोडच्या लो बजेट चित्रपटाने जवळपास  25 करोडचा गल्ला कमावला. नंतर 2018 मध्ये तिचा ” गीता गोविंदम ” हा चित्रपट आला . हा तिच्या करियरचा टर्निंग  पॉइंट ठरला . 5 करोडच्या ह्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग 130 करोड कमावले. ह्या चित्रपटाची स्टोरी हटके होती . यात विजय देवरकोंडा आणि तिच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. पूर्ण भारतमध्ये हा चित्रपट बघितला गेला. आणि या चित्रपटानंतर रश्मिकाची चित्रपटात मागणी वाढली. मग आला दर्शनचा यजामना (2019). या तेलगू चित्रपटाने खास काम केले नाही ,आणि हा चित्रपट फ्लॉप झाला . पण हा चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला, आणि यु टयूब वरती हा चित्रपट २०० मिलियन पेक्षा जास्त वेळा बघितला गेला. नंतर सारीलेरू नीकेववारू (2020) आणि भीष्मा (2020) या यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले. भविष्यामध्ये या अभिनेत्रीचे सुपर हिट चित्रपट झळकतील अशी अपेक्षा आहे.

अशा या दाक्षिणात्त्य अभिनेत्रीला दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!(beautiful actress rashmika mandanna is national crush of india 2020)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लागिरं झालं जी’ फेम शिवानी बावकरचा साेज्वळ अंदाज, पाहून तुम्ही पडाल प्रेमात

राम चरण अन् व्यंकटेशसोबत सलमान नाचला लुंगी डान्सवर; चाहते म्हणाले,’साँग ऑफ द इयर’

हे देखील वाचा