Friday, January 27, 2023

जाणून घ्या नॅशनल क्रश रश्मिका मंदानाची २०२२ मधील वादांची मालिका

‘कलाकार’ हा शब्द उच्चारला की ‘वाद’ शब्द देखील ओघाने येतोच. कलाकार आणि त्यांचे वाद हे आता लोकांसाठी नवीन नाही. कोणताही कलाकार किती चांगले, मोठे, प्रसिद्ध कलाकार असले तरी त्यांच्यासोबत कोणता कोणते लहान, मोठ्या स्वरूपातील वाद जोडले गेलेच आहे. याला कोणताही कलाकार अपवाद राहिला नाही. नॅशनल क्रश म्हणून नावारूपास आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. रश्मिकाने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या लोभस हास्याने सर्वांचेच मन जिंकून घेतले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत प्रसिद्ध असणाऱ्या रश्मिकाने ‘पुष्पा’ सिनेमातून संपूर्ण देशात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता तर बॉलिवूडमध्ये देखील ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. आजच्या घडीला रश्मिकाचे संपूर्ण देशात किंबहुना संपूर्ण जगात कोट्यवधी फॅन्स आहेत. अतिशय कमी वयात तिने अमाप लोकप्रियता, पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. पण यासोबतच तिने अनेक वादांना देखील आमंत्रण दिले. पाहूया २०२२ या वर्षातील रश्मिकाचे काही तुफान गाजलेले वाद.

 

नुकतेच रश्मिकाने तिच्या आगामी ‘मिशन मजनू’ या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान असे काही वक्तव्य केले ज्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी रश्मिकाने ती बॉलिवूडमधील गाणे ऐकतच मोठी झाली असल्याचे सांगितले. दरम्यान तिने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल देखील एक वक्तव्य केले. ती म्हणाली, “मला लहानपणापासूनच रोमँटिक गाण्यांचा अर्थ बॉलिवूडची गाणी असाच होता. तर दाक्षिणात्य चित्रपटांमधील गाणी आयटम सॉंग्स असतात ज्यात मोठ्या प्रमाणावर माल मसाला आणि भरपूर डान्स असतो.” तिच्या या म्हणनायमुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर प्रेम करणारे लोकं चांगलेच नाराज झाले.

याशिवाय २०२२ साली तिची विकी कौशलसोबत एका अंडरवियर ब्रांडच्या जाहिरातीत काम केले. मात्र या जाहिरातीचा कंटेंट प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. या जाहिरातींवरून प्रेक्षकांनी तिला मोठ्या प्रमाणावर खडेबोल सुनावले. तिला सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी “तू आधी स्क्रिप्ट नीट वाच आणि ऐक. अशा अश्लील जाहिरातींना होकार नॉक्स देऊ.” असे सल्ले देखील दिले.

काही दिवसांपूर्वीच ऋषभ शेट्टी यांचा ‘कांतारा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान हिट देखील झाला. २०२२ मधील अतिशय गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असणारा कांतारा सिनेमा न पाहिल्यामुळे देखील तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. यात तिला तिच्यापेक्षा मोठ्या कलाकारांचा सन्मान न केल्यामुळे आणि आपल्या मुळांना विसरल्यामुळे ट्रोलिंग सहन करावे लागले.

रश्मिकाचा २०२२ वर्षात पहिला हिंदी सिनेमा ‘गुडबाय’ प्रदर्शित झाला यात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी तिने खुलासा केला की, तिला अभिनेत्री नव्हते व्हायचे. तिने सांगितले की, तिला एका प्रोडक्शन हाऊसमधून फोन आला होता. मात्र तिला वाटले की कोणी तिची फिरकी घेत असेल. हा किस्सा सांगताना तिने त्या प्रोडक्शन हाऊसचे नाव न घेतल्याने तिला ट्रॉल केले गेले. एवढेच नाही तर तिला कन्नड इंडस्ट्रीमध्ये बॅन करण्याची देखील मागणी झाली.

रश्मिका मंदानाने २०१६ साली ‘किरिक’ या सिनेमातून तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१७ साली ‘केजीएफ’ स्टार यश बद्दल बोलताना तिने त्याला कन्नड इंडस्ट्रीमधील ‘मिस्टर शो ऑफ’ म्हणून संबोधले होते. यांनतर देखील तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले.

‘गुडबाय’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रश्मिकाचे अनेक मोठे सिनेमे २०२३ मध्ये तिच्या फॅन्सला पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी

हे देखील वाचा