Friday, July 5, 2024

…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!

स्मिता पाटील भारतीय सिनेसृष्टीतील एक खणखणीत वाजणारं नाणं! दुर्दैवाने ते आजच्याच दिवशी काही वर्षांपूर्वीच कालवश झालं. परंतु हे नाणं इतकं खणखणीत वाजलं होतं की त्याचा खणखणाट आजता गायत आपल्याला ऐकू येत आहे.

स्मिताचं असं अकस्मात जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं. परंतु आपल्याला माहीत आहे का, की स्मिताने जाण्यापूर्वी एक अंतिम इच्छा सांगितली होती. आज (१३ डिसेंबर) स्मिता यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्तान आपण तिची शेवटची इच्छा आणि तिचा जीवनपटावर प्रकाश टाकणार आहोत.

स्मिताची यांच्या आयुष्याच्या सुरुवातीचा टप्पा…

स्मिताने पुण्याच्या एफ.टी.आय.आय. मधून शिक्षण घेतलं असलं तरी तिला चित्रपटांमध्ये करियर करायचं नव्हतं. योगायोगाने तीची इच्छा नसताना देखील तिला सिनेसृष्टीत पदार्पण करावं लागलं.

खरं तर तिला आणलं गेलं म्हणाना! आपल्याला तर ठाऊकच आहे की या सिनेसृष्टीत भले भले आले आणि देशोधडीला लागले. परंतु जे जिद्दी आणि प्रामाणिक होते तेच त्यांचं नाव कमावू शकले. आणि याच व्यक्तींपैकी स्मिता होती.

तिला जरी आणलं गेलं होतं तरी तिचा अभ्यास फार दांडगा होता. तिची सतत काही तरी शिकत राहण्याची वृत्तीच तिला इतकं यश देऊन गेली.

…..आणि स्मिताचं काम बोलू लागलं

आधी नकार दिल्यानंतर आई वडिलांच्या म्हणण्यानुसार श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ या सिनेमाद्वारे तिने तिच्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर तिने पुन्हा कधी मागे वाळूनच पाहिलं नाही. हिंदी आणि मराठी या दोन चित्रपट सृष्टीमध्ये ती एकाचवेळी कार्यरत होती.

मंथन, आक्रोश, भूमिका, उंबरठा, सामना, नमकहलाल, मंडी, अर्धसत्य, जैत रे जैत हे तिचे काही गाजलेले मराठी आणि हिंदी सिनेमे आहेत. उंबरठा मधील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे स्मितावर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांना आजही स्मृतींमध्ये काही काळ मागे घेऊन जातं.

स्मिताच्या लग्नाला आई विद्याताईंचा होता विरोध…

स्मिता आणि राज बब्बर यांची ‘भिगी पलकें’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. लग्नाविषयी चर्चा होऊ लागली. परंतु आई विद्याताईंचा या लग्नाला साफ नकार होता. याला कारणही तसंच होतं म्हणा…

राज बब्बर यांचं आधीच त्यांची पत्नी नादिया यांच्याशी लग्न झालं होतं. आणि तरीही स्मिता त्यांच्या प्रेमात पडली होती. तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. जे तिने पुढे जाऊन केलं देखील. परंतु आईचा रोष मात्र तिने ओढवून घेतला.

…आणि तिने तिची शेवटची इच्छा सांगितली.

लग्न झाल्यानंतर स्मिता आनंदात राहत होती. स्मिता काही दिवसातच गरोदर राहिली. राज आणि स्मिता यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्याच नाव दोघांनी मिळून प्रतीक असं ठेवलं. पण काळापुढे कुणाचं काहीच चालत नाही.

प्रतिकच्या जन्मानंतर काही दिवसातच म्हणजेच १३ डिसेंबर १९८६ रोजी स्मिता आपल्या सर्वांना अकस्मात सोडून निघून गेली.

मरण्या अगोदर काही दिवसांपूर्वी तिने तिची शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. ती अशी की, ‘जर ती गेली तर तिला सवाष्ण महिले प्रमाणे नटवून निरोप द्यायचा. आणि अक्षरशः सवाष्ण महिलेप्रमाणेच स्मिता ने या जगाचा निरोप घेतला.’

तिच्या दहा वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीत तिने मराठी आणि हिंदी भाषेतील तब्बल ८० चित्रपटात काम केलं. आणि आपणा सर्वांना अमर्याद आनंद दिला. स्मिता ला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार तर १९८५साली चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

चला तर मग तिच्या पवित्र स्मृतीस समरण करून आपल्याला स्मिता चा कोणता चित्रपट आवडतो हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

हे देखील वाचा