चौथ्यांदा बाबा झाला सैफ! सैफच्या पहिल्या दोन मुलांबद्दल तुम्हाला माहितीय का? काय काम करतात आज ती?


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांना आई- बाबा झाले आहेत. करीना ही गेल्या नऊ महिन्यापासून आपल्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेत होती. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेक वेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत चालली होती. शिवाय गरोदरपणात देखील अनेकवेळा ती मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य यांच्या सोबत वेळ घालवत दिसणारी करीनाने आपल्या बाळाला १५ फेब्रुवारीला जन्म दिला.

सैफिनाला मुलगा झाल्याची बातमी सैफची बहीण सबा अली खान आणि करीना कपूर हिची चुलत बहीण रिद्धीमा कपूर ह्या दोघींनी आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली होती. ज्या वेळी करीनाला मुलगा झाला तेव्हा सोशल मीडियावर खूप मिम्स बनवले गेले होते, ज्याची मज्जा नेटकरी घेत होते.

सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग या दोघांचा घटस्फोट होईपर्यंत त्यांच्या नात्यात बरीच कटुता निर्माण झाली होती. परंतु आपल्या नात्यात आलेल्या दुराव्याचा कोणताच दुष्परिणाम ते आपल्या मुलांवर होऊ देत नाही. सैफची पहिली पत्नी अमृता हिला एक मुलगा आणि मुलगी आहे, ज्यांची नावे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी आहेत. साराचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ मध्ये झाला होता. ती आज एक यशस्वी अभिनेत्री आहे. अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने सुशांत सिंग सोबत पदार्पण केले होते. या चित्रपटामुळे तिची प्रशंसा देखील झाली.

बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिने न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली आहे. एक सामान्य मुलीसारखे आयुष्य तिने अभ्यास करताना जगली आणि त्यातूनच तिला खूप काही शिकायला मिळाले. तर इब्राहिम खान याचा जन्म ४ मार्च २००१ मध्ये झाला होता. त्याने अद्यापही चित्रपटात पदार्पण केले नाही. तो एक प्रसिद्ध स्टार कीड आहे. तो आपल्या वडिलांसारखा दिसत असून सैफच्या पावलावर पाऊल ठेऊन मॉडेलिंगमध्ये उतरला आहे. नुकतेच त्याने प्रख्यात डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी फोटोशूट केले आहे.

अमृता सोबत घटस्फोट झाल्यावर करीनासोबत सैफने २०१२ मध्ये लग्न केले. त्यानंतर २० डिसेंबर २०१६ ला सैफीनाच्या तैमुरचा जन्म झाला. तैमुर कित्येकदा प्रकाशझोतात अनेक बातम्यांद्वारे येत असतो. त्यामुळे नेहमीच कित्येक प्रसारमाध्यमे तो चर्चेचा विषय बनत असतो. नवीन पाहुण्याच्या आगमनापूर्वीच सैफ आणि करीना हे आपल्या नवीन घरात शिफ्ट झाले होते. जिकडे या बाळासाठी नर्सरी देखील तयार केली आहे, जेणेकरून तैमुर आपल्या भावासोबत खेळू शकेल.

रेफ्युजी या चित्रपटाद्वारे करिनाने चित्रपसृष्टीमध्ये पाऊल टाकले होते, त्यानंतर तीने कभी खुशी कभी गम या चित्रपटात काम केले.  हा चित्रपट फार हिट झाला होता. सोबतच खुशी, अजनबी, मै प्रेम की दिवानी हू, ३ ईडीयट, बॉडीगार्ड, रावण, उडता पंजाब असे अनेक चित्रपट तिचे गाजले. तर सैफने परंपरा या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. सोबतच पहचान, सुरक्षा, दिल है दिवाना, उडाण, आरजू, दिल चाहता है, कल हो ना हो, कुर्बान, बुलेट राजा यांसारख्या अनेक चित्रपटात त्याने काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.