Tuesday, July 9, 2024

अमेरिकन मॉडेल बेला हदीदने केले रडणारे फोटो शेअर, म्हणाली, ‘सोशल मीडिया…’

प्रत्येकाच्या आयुष्यात दोन गोष्टी या सारख्याच असतात. ती म्हणजे एक सुख आणि दुसरी दुःख. कारण माणूस कितीही श्रीमंत किंवा गरीब असला, तरी देखील त्याच्या आयुष्यात या दोन गोष्टींना खूप महत्त्व असते. हे केवळ सर्वसामान्य माणसांच्या बाबतीतच घडते, असे नाही. कित्येकवेळा मोठ-मोठे कलाकार देखील नैराश्याचा सामना करताना दिसतात. गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी नैराश्याबद्दल खुलेपणाने बोलून दाखवले आहे की, ते याला बळी पडले आहेत किंवा अजूनही त्रस्त आहेत. केवळ बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड कलाकारही तणावावर अनेकदा खुलेपणाने बोलले आहेत. अलीकडेच प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल बेला हदीदने देखील तिच्या मानसिक स्थितीबद्दल खुलासा केला आणि तिचे रडणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बेलाने वेदना केल्या व्यक्त
बेलाने विलो स्मिथचा एक व्हिडिओ आणि रडतानाचे फोटो शेअर करत म्हटले आहे की, तिला असे वाटते की, कधीकधी ती कोणासाठीही योग्य नसते. व्हिडिओ शेअर करताना बेलाने लिहिले की, “विलो मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझ्या शब्दांवर प्रेम आहे, मला हे पाहून असे वाटले की, मी पूर्णपणे एकटी नाही. त्यामुळे मी तुझी पोस्ट लाईक केली.”

तिच्या असुरक्षिततेबद्दल आणि भावनांबद्दल बोलताना २५ वर्षीय मॉडेल म्हणाली की, “या अशा गोष्टी आहेत, ज्या प्रत्येकाला वाटतात. लोक विसरतात की, प्रत्येकाला सारखेच वाटते, हरवलेले, आपल्याला काय हवे आहे हे माहित नसते.” ती पुढे म्हणाली की, “प्रत्येकाला सारखीच अस्वस्थता वाटते.”

पोस्ट शेअर करताना बेलाने तिच्या चाहत्यांना सांगितले की, “सोशल मीडियाचे आयुष्य खरे नाही.” लोकांनी बेलाला आजपर्यंत रनवे मॉडेल म्हणून पाहिले आहे, कधी ती ग्लॅमरस फोटोशूट करते, तर कधी मॅगझिनच्या पहिल्या पानावर दिसते. मात्र, ती म्हणते की, ती सोशल मीडियावर जे पाहते ते खरे नाही.

बेलाने फोटो शेअर करत लिहिले की, “अनेक वर्षांपासून दररोज सकाळी रोजची गोष्ट आहे.” बेलाने बर्न आऊट आणि ब्रेकडाउनची तक्रार केली आहे. ती म्हणाली की, “हे सर्व इतकं सहन केलं आहे की, सुख कशात मिळतं आणि दु:ख कशात मिळतं, हे मला माहिती आहे. जर तुम्ही स्वत:साठी वेळ काढलात, तर तुम्ही तुमचे सुख-दु:ख ओळखू शकता आणि मग जे तुमच्यासाठी चांगले आहे ते हाताळायलाही शिकू शकता.” बेला हदीदच्या या खुलाशावर तिची बहीण गिगी हदीद आणि इतर कलाकारांनी तिचे खूप कौतुक केले आहे.

बर्नआउट ही केवळ सेलिब्रिटींसाठी समस्या नाही, तर कोणालाही याची काळजी वाटते. हे एक सिंड्रोम आहे, जे कामाच्या तणावामुळे उद्भवते आणि अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा