Wednesday, July 17, 2024

विक्रम बत्राच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धार्थ मल्होत्राने केली खास पोस्ट; म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Siddharth Malhotra) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. 2021 मध्ये आलेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात त्याने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. कारगिल युद्धाचे नायक विक्रम बत्रा यांना शेरशाह म्हणून ओळखले जाते. कॅप्टन विक्रम बात्रा यांची आज २५ वी पुण्यतिथी आहे. यावेळी अभिनेत्याने त्यांची आठवण काढली. सिद्धार्थने रविवारी सोशल मीडियावर त्याच्या शौर्य आणि सन्मानाच्या वारशाची प्रशंसा करत एक पोस्ट शेअर केली.

सिद्धार्थ मल्होत्राने त्याच्या एक्स अकाउंटवर एक जुना फोटो शेअर करून कॅप्टन विक्रम बत्राची आठवण काढली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, तुमच्या निर्भय कृतीला आणि सर्वोच्च बलिदानाला 25 वर्षे झाली आहेत. आजही तुमचा वारसा शौर्य आणि सन्मानाच्या सर्वोच्च आदर्शांवर आधारित आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘आम्ही आज आणि नेहमीच ‘ये दिल मांगे मोर’साठी तुमची आठवण करतो आणि आदर करतो. जय हिंद कॅप्टन विक्रम बत्रा. ट्विटरसह, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर कॅप्टन विक्रम बत्रासाठी पोस्ट देखील शेअर केली आहे.

1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भारतीय लष्कराच्या JAK RIF रेजिमेंटच्या 13 व्या बटालियनमधून आपल्या सैन्याचे नेतृत्व केले. 7 जुलै 1999 रोजी वयाच्या 24 व्या वर्षी पाकिस्तानी लष्कराशी लढताना ते शहीद झाले. यानंतर कॅप्टन बत्रा यांना युद्धकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. ‘ये दिल मांगे मोर’ हा त्यांचा विजयी नारा होता.

भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. यंदा त्याचा 25 वा वर्धापन दिन आहे. विष्णुवर्धन दिग्दर्शित ‘शेरशाह’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा आणि त्याचा जुळा भाऊ विशाल बत्रा यांची दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात सिद्धार्थसोबत कियारा अडवाणी दिसली होती. या चित्रपटात तिने कॅप्टन बत्राची मंगेतर डिंपल चीमाची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

विशाल पांडेच्या पालकांनी बिग बॉसकडे मागितला न्याय, अरमानला घराबाहेर काढण्याची केली विनंती
पुण्याच्या आकाश-सुरज या जुळ्या भावांनी जिंकले, ‘मी होणार सुपरस्टार जोडी नं.1’ चे विजेतेपद

हे देखील वाचा