Wednesday, July 2, 2025
Home साऊथ सिनेमा ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास

ब्रेकिंग! ‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, हृद्य विकाराच्या झटक्याने मध्यरात्री घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध बंगाली गायिका निर्मला मिश्रा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. दक्षिण कोलकाता येथील चेतला भागातील त्यांच्या घरी रविवारी पहाटे निर्मलाने अखेरचा श्वास घेतला. निर्मला मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी ही माहिती दिली.

बालकृष्ण दास पुरस्काराने सन्मानित निर्मला मिश्रा दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित आजारांशी झुंज देत होत्या. डॉक्टरांनी पीटीआयला सांगितले की मिश्रा यांना दुपारी १२:०५ वाजता हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना जवळच्या नर्सिंग होममध्ये नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

वृत्तानुसार, निर्मला मिश्रा यांचे पार्थिव रविवारी सकाळी रवींद्र सदनात नेण्यात येणार आहे. जिथे त्यांचे चाहते त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करू शकतील. त्यानंतर कोर्टाला स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मिश्रा यांनी उडिया आणि बंगाली भाषेतील चित्रपटांमध्ये अनेक गाणी गायली. ‘ऐमोन एकता झिनुक’, ‘बोलो तो अर्शी’, ‘कागोजेर फूल बोले’, ‘ऐ बांग्लार माती ती’ आणि ‘आमी तो तोमर’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला.

निर्मला मिश्रा यांचा जन्म १९३८ मध्ये माजिलपूर, दक्षिण २४ परगणा येथे झाला. त्यानंतर ती कोलकाता येथील चेतला येथे कुटुंबासह राहायला गेली. निर्मलाचे बालपण संगीतमय वातावरणात गेले. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि ती लहानपणापासूनच चांगली गायची.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कायद्याच्या कचाट्यात अडकला अक्षय कुमारचा ‘रामसेतू’ चित्रपट, घटना चुकीच्या पद्धतीने दाखविल्याचा आरोप

उर्फीच्या वक्तव्यावर एक्स बॉयफ्रेंडने सोडले मौन; म्हणाला, ‘मागून बोलण्यापेक्षा सामोर येऊन…’

मीडियाला पाहताच एकमेकांचे पटापट मुके घेऊ लागले राखी आणि आदिल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा