मीडियाला पाहताच एकमेकांचे पटापट मुके घेऊ लागले राखी आणि आदिल, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) नेहमीच चर्चेत असते. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येते. अभिनेत्री आजकाल तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी खानसोबत दिसत आहे. दोघे अनेकदा एकत्र पॅपराझीच्या कॅमेऱ्यात कैद होतात. दरम्यान, नुकतेच हे कपल एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचले, जिथे दोघांनी असे काही केले की सर्वत्र त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली.

आदिल आणि राखी एका कार्यक्रमात एकत्र आले होते, जिथे कॅमेरे पाहताच दोघांनी एकमेकांना किस करायला सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघे एकमेकांना कसे प्रेमाने पुन्हा पुन्हा किस करत आहेत. व्हिडिओमध्ये आदिलने डॉर्क पर्पल कलरचा सूट घातला आहे तर राखी तपकिरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले आहे. अलीकडेच तिने रितेशपासून वेगळे होण्याची घोषणा केली. त्याआधी अभिनेत्रीने रितेशशी लग्न केल्याचा दावा केला होता. या दोघांची जोडी बिग बॉसमध्येही एकत्र दिसली होती. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. सध्या राखी आदिलला डेट करत आहे. आदिल हा व्यापारी आहे. काही काळापूर्वी दोघे दुबईत एकत्र सुट्टी घालवताना दिसले होते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर काही कारणांनी त्यांनी वेगळे झाल्याची घोषणा केली. त्यानंतर राखीने देखील खूप ड्रम तयार केला. त्यानंतर तिची भेट आदिलसोबत झाली आणि ते दोघे रिलेशनमध्ये आले. आता ते दोघे देखील अनेक ठिकाणी स्पॉट होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

जेव्हा शशी कपूर यांनी मुमताजसोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता , तेव्हा घडले ‘असे’ काही

अभिनयाच्या पहिल्या नाही, तर दुसऱ्या संधीत चमकले होते कियारा आडवाणीचे नशीब; जाणून घ्या तिचा सिनेप्रवास

‘आम्हाला मुंबईचा अभिमान’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सचिन पिळगावकर यांची रोखठोक प्रतिक्रिया!

Latest Post