Friday, November 22, 2024
Home नक्की वाचा बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून

बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून

बाबा या शब्दातच आदर, प्रेम, भीती सर्वकाही सामावलंय, बरोबर ना. बाबा म्हणजे जवळपास प्रत्येकासाठी मोठा आधारस्तंभ, आधार असतो. त्याचं असणं हेच समाधान देणारं असतं. प्रत्येक मुला- मुलीचं आपल्या बाबाशी असलेलं नातं हे वेगळंच असतं. अनेकदा विविध चित्रपटांमधूनही मूल आणि बाबा यांच्यातील नात्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे. मित्रांनो तुम्ही म्हणत असाल आज एवढं बाबांबद्दल आम्ही का बोलतोय, तर कारण एकदम सिंपल आहे, आज आपण या लेखातून अशा चित्रपटांबद्दल जाणून घेऊ, ज्यात वडील आणि मुलांमधील अनोखे नाते दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

द लायन किंग
या यादीतील पहिला चित्रपट म्हणजे ‘द लायन किंग’ होय. हा चित्रपटही वडील आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. हा एक ऍनिमिटेड चित्रपट आहे. ज्यात सिंहाचा मुलगा सिंबाची कथा आहे. त्याला काका निशाणा बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्याच्यासाठी त्याचे वडील बलिदान देतात. वडील- मुलाच्याच नात्यातील प्रेम दाखवणारा आणखी एक ऍनिमिटेड चित्रपट आहे. निमो हा एक मासा असून त्याचे वडील मार्लिन शाळेत सोडतात, पण निमोला स्कुबा ड्रायवर्स पकडतात, त्यानंतर निमोला शोधण्यासाठी मार्लिनचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यास आला आहे. यात वडिलांना त्यांच्या मुलाबद्दल वाटणारी काळजी प्रेम सर्वच गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे.

अंग्रेजी मीडियम
या यादीतील पुढील चित्रपट म्हणजे ‘अंग्रेजी मीडियम’ होय. इम्रान खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात वडील आणि मुलीचे नाते दाखवले आहे. मुलीच्या स्वप्नासाठी वडीलांनी घेतलेली मेहनत या चित्रपटाची कथा सांगते. मुलीच्या प्रेमाखातर वडील कोणत्या स्तराला जाऊन तिला खूश ठेवू शकतात हे देखील हा चित्रपट दाखवतो.

दंगल
फोगट भगिनींवर आधारीत आलेल्या ‘दंगल’ चित्रपटातही वडिलांनी त्यांच्या मुलींना कुस्तीपटू बनवण्यासाठी घेतलेले कष्ट दाखवले आहेत. ‘मारी छोरी छोरो से कम है क्या’, असं म्हणत मुलींना धाकड गर्ल बनवणाऱ्या वडिलांचं प्रेमही या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

पिकू
अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘पिकू’ हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्याबद्दल सांगून जातो. यात वडील आणि मुलीचे विचार वेगवेगळे असतात, त्यामुळे त्यांच्यात छोटे-मोठे वादही होतात. मात्र, हळूहळू एका प्रवासात ते एकमेंकांना समजून घ्यायला लागतात.

रिंगण
मराठीतही वडिलांचं प्रेम दाखवणारे चित्रपट आले आहेत. यात ‘रिंगण’ या चित्रपटाचाही समावेश आहे. वडील आणि मुलाच्या नात्यातील हळवेपणा दाखवणारा हा चित्रपट आहे. दुष्काळामुळे कर्जात अडकलेला बाप आणि आपल्या दिवंगत आईच्या प्रेमासाठी भूकेलेला सात वर्षांचा मुलगा यांचा सुखासाठी आणि प्रेमासाठीचा शोध या चित्रपटातून दाखवलाय.

ताऱ्यांचे बेट
दहाएक वर्षांपूर्वी आलेला ‘ताऱ्यांचे बेट’ हा चित्रपट देखील मुलांच्या प्रेमासाठी वडिलांनी घेतलेल्या कष्टाबद्दल भाष्य करतो. श्रीधर एक साधा कारकून जेव्हा मुंबईला कुटुंबाबरोबर फिरायला येतो, तेव्हा त्याच्या १० वर्षांचा मुलाने केलेला हट्ट पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने केलेले कष्ट यात दाखवले आहेत.

द परस्युट ऑफ हॅप्पीनेस
हॉलिवूडमधील ‘द परस्युट ऑफ हॅप्पीनेस’ या चित्रपटाची कथा ख्रिस या पात्राच्या भोवती फिरते. त्याची पत्नीही त्याला सोडते. तो जगण्यासाठी संघर्ष करत असताना त्याच्या मुलाच्या कस्टडीसाठीही प्रयत्न करतो. यातून वडील आणि मुलाचे एक सुंदर नातेही दाखवण्यात आलंय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
एकाला संधी मिळावी म्हणून घरातले सगळे तडफडतात, पण तिकडं गोविंदाच्या तीन पिढ्या गाजवतायत फिल्मइंडस्ट्री
एकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर
शाहरुखच नाही, तर ‘या’ मराठी अभिनेत्यानेही अवलंबलाय सरोगसीमार्फत पालक होण्याचा मार्ग, मोठी आहे यादी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा