एकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर

0
379
Zeenat-Aman-And-Anu-Aggarwal
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Tabassum Talkies

अभिनय क्षेत्रात यायचं म्हणजे फक्त अभिनयाच्या शैलीवरच लक्ष देऊन चालत नाही ना, त्याचबरोबर लूक्स, स्टाईल आणि आपला अपियरन्स या गोष्टीही बऱ्याचदा महत्त्वाच्या ठरतात. त्याचमुळे यातील कोणत्याही गोष्टीला धक्का बसला तरी एखाद्या चांगल्या ऍक्टरचं करियरही धोक्यात येण्याची शक्यता असते. बरं असं कधी आधी झालंय का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही आहोत ना. आज आपण जाणून घेऊया की, कोणत्या अभिनेत्याच्या करियरला एका मोठ्या धक्क्यामुळे जोरदार ब्रेक लागला.

साधना
या यादीत पहिलं नाव आहे, साधना. तुम्ही साधना हेअर कट असं ऐकलं असेलच तर जिच्यामुळे हे नाव पडलं तीच अभिनेत्री साधना आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती. तिच्या चित्रपटांनाही मोठी पसंती मिळायची, पण तिला ७० च्या दशकात थायरॉइडचा त्रास सुरू झाला. याच काळात ती तिच्या करियरच्या शिखरावर होती. मात्र, थायरॉईडमुळे तिचे ज्यासाठी सर्वाधिक कौतुक व्हायचे त्याच डोळ्यांचे रूप पालटत गेले आणि साधनाच्या सौंदर्याची जादू हळूहळू ओसरत गेली. त्यानंतर ती थायरॉइडमुळे आजारी पडत होती. अखेर २०१५ मध्ये तिने अखेरचा श्वास घेतला.

झीनत अमान
या यादीतील दुसरे नाव म्हणजे झीनत अमान. असे म्हटले जाते की ती संजय खान यांच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये होती आणि तिने लग्नही केले होते, पण संजय खान यांचे आधीच लग्न झालेले असल्याने त्यांचा लगेचच घटस्पोट झाला. मात्र, संजय खान हे झीनतच्या आयुष्यातील एक विसरण्याजोगा व्यक्ती ठरले. कारण, एका पार्टिदरम्यान त्यांनी तिला रागात इतकी मारहाण केली होती की, तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचा परिणाम तिच्या करियरवरही झाला. तिने नंतर मझर खानशी लग्न केले, पण या लग्नानंतरही तिला सुख मिळाले नाही.

चंद्रचूड सिंग
एकेवळी चंद्रचूड सिंग हा बॉलिवूडमधील उभारता सितारा होता. तो भविष्यात मोठा स्टार बनेल असं अनेकांना वाटलेलं. पण २००० साली तो गोव्यात असताना जेट स्किइंग करताना त्याचा मोठा अपघात झाला आणि त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. यातून बाहेर येता येता त्याला जवळपास १० वर्षे लागली. यामुळे त्याच्या ऍक्टिंग करियरला मात्र जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्याने अभिनयात पुनरागमन केले, पण तो तीच जादू दाखवू शकला नाही.

महिमा चौधरी
याच यादीत महिमा चौधरीचेही नाव येते. परदेस चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या महिमाने आपली वेगळी ओळख फिल्मी दुनियेत बनवण्यास सुरूवात केली होती, पण १९९९ साली ‘दिल क्या करे’ चित्रपटाचे शूटींग सुरु असताना ती सेटमधून बाहेर जात होती. त्यावेळी एका ट्रकने तिच्या कारला जोरधार धक्का दिला. या अपघातात महिमाच्या चेहऱ्यात काचेचे तुकडे घुसले होते. ज्यामुळे तिला फेस सर्जरी करावी लागली, पण या अपघातामुळे तिच्या फिल्मी करियरला धक्का दिला. आता ती सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे.

अनु अगरवाल
या यादीतील अखेरचे नाव म्हणजे अनु अगरवाल. नव्वदच्या दशकात आलेल्या आशिकी चित्रपटाने तिला एका रात्रीत स्टार बनवले होते. मात्र, १९९९ मध्ये तिचा एक भयानक अपघात झाला. ज्यामुळे ती २९ दिवस कोमामध्ये होती. त्यानंतरही शुद्धीत आल्यानंतर तिची स्मृती गेली होती, पण उपचाराअंती ती काही काळाने बरी झाली. तोपर्यंत तिचे अभिनय करियर संपले होते. तिने नंतर योगा अभ्यासावर लक्ष्य केंद्रित केले. आजही ती सोशल मीडियावर सक्रिय असते, पण अभिनय क्षेत्रापासून मात्र दूर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
शाहरुखच नाही, तर ‘या’ मराठी अभिनेत्यानेही अवलंबलाय सरोगसीमार्फत पालक होण्याचा मार्ग, मोठी आहे यादी
काळाच्या ओघात हरवलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य, ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीचाही समावेश
एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here