Tuesday, July 9, 2024

‘डिस्को किंग’ बप्पी लहिरी यांनी अजरामर केली संगीतसृष्टी, ही आहे त्यांची सदाबहार गाणी

बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या बप्पी लहरी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री शोक सागरत बुडाली आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. जी आजही अनेकांना खिळवून ठेवते. त्यांची अनेक सदाबहार गाणी आहेत जी त्यांच्या चाहत्यांच्या ओठावर आहेत. चला तर जाणून घेऊया बप्पी लहरी यांच्या करीअरमधील काही सदाबहार गाणी जी आजही अनेकांच्या ओठांवर आहेत.

तम्मा तम्मा लोगे

बप्पी लहरी यांच्या करीअरमधील ‘तम्मा तम्मा’ हे गाणे खूप गाजले होते. हे गाणे १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला बप्पी लहरी यांनी आवाज दिला होता. या गाण्याला त्यांच्यासोबत गायिका अनुराधा पौडवाल यांनी साथ दिली होती.

यार बिना चैन कहा रे

बप्पी लहरी यांचे ‘यार बिना चैन कहा रे’ हे गाणे त्याकाळी अनेक तरुणांच्या ओठांवर होते. हे गाणे १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहब’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला त्यांनी जानकीसोबत गायले होते. आजही हे गाणे अनेकांच्या ओठांवर आहे.

सुपर डान्सर

मिथुन चक्रवर्ती यांच्या चित्रित केलेल्या या गाण्याने १९८७ साली चित्रपटसृष्टी गाजवली होती. हे गाणे बप्पी लहरी यांनी गायले होते. ‘डान्स डान्स’ या चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. या गाण्याला बप्पी लहरी यांच्यासोबत आलिषा चीनाई यांनी आवाज दिला होता.

उलाला उलाला

विद्या बालन हिच्यावर चित्रित केलेल्या ‘उलाला उलाला’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले. ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटातील हे गाणे होते. २०११ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘उलाला उलाला’ गाण्याला बप्पी लहरी आणि श्रेया घोषाल यांनी आवाज दिला होता.

याद आ रहा है तेरा प्यार

‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील ‘याद आ रहा है तेरा प्यार’ हे गाणे खूप गाजले होते. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. १९५३ साली आलेल्या या गाण्याची आजही बॉलिवूडमध्ये क्रेझ आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा