दाक्षिणात्य चित्रपट आपल्या दमदार कथा आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाने मने जिंकत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेले ‘मीनल मुरली’ आणि ‘जय भीम’ सारखे चित्रपट याचे उदाहरण आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार २०२२ मध्ये पॅन इंडिया बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यासाठी सज्ज आहे आणि अशा परिस्थितीत बॉलिवूडने सावध असले पाहिजे. कारण गेल्या वर्षीच्या टॉप १० चित्रपटांच्या यादीत तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचे वर्चस्व होते. २०२२ मध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR), राम चरण (Ram Charan), प्रभास (Prabhas), विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि यश (Yash) यांचे चित्रपट बॉलिवूड कलाकारांना आव्हान देणार आहेत.
विजय देवरकोंडा
विजय देवरकोंडा ‘लायगर’मधून धमाल करणार आहे. तो ऍक्शनसह धमाल उडवणार असून, या चित्रपटात तो फायटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडेही आहे आणि हा चित्रपट हिंदीसह इतर अनेक भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
प्रभास
प्रभास २०२२ मध्ये अनेक चित्रपट घेऊन येत आहे. यापैकी बहुतेक चित्रपट संपूर्ण भारतातील आहेत. ज्यात ‘राधे श्याम’, ‘सालार’ आणि ‘आदिपुरुष’ यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांमध्ये प्रभासची वेगळी स्टाईल पाहायला मिळेल.
यश
यशचा सुपरहिट चित्रपट ‘केजीएफ’चा पार्ट २ येणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये त्याच्यासोबत संजय दत्त देखील दिसणार आहे आणि यावेळी कथा पूर्वीपेक्षा अधिक शानदार दिसेल.
राम चरण
एस.एस राजामौलीच्या ‘आरआरआर’मध्ये राम चरण ऍक्शन स्टाईलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ७ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
ज्युनियर एनटीआर
‘आरआरआर’मध्ये राम चरणसोबत ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे. दोघांचे ऍक्शन सीन खूप पसंत केले जात आहेत आणि चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
हेही वाचा-