Saturday, April 20, 2024

बॉक्स ऑफिसवर यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-१’वर वरचढ ठरला अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’, पाहा दिवसानुसार कमाई

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चित्रपट नेहमीच कमाईच्या बाबतीत एकमेकांना टक्कर देताना दिसतात. आता ‘आयकॉन स्टार’ अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा‘ प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून ट्रेड ऍनालिस्टही हैराण झाले आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रिटिक्स यावर खास लक्ष देत नव्हते, परंतु आता या चित्रपटाने सुपस्टार यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-१‘ चित्रपटापेक्षाही जबरदस्त कमाई केली आहे.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ला पॅन इंडिया चित्रपट म्हटले जात होते, परंतु त्याचे प्रमोशन फारच खराब झाले होते. हिंदी भाषिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विशेष काही केले नव्हते. ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळीही काही कारणांमुळे हिंदी ट्रेलर उशिरा प्रदर्शित करण्यात आला होता.

असे असले तरीही, अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेमुळे आणि त्याच्या शब्दांमुळेच बॉक्स ऑफिसवर हे भलेमोठे आकडे येत आहेत. पाचव्या दिवसाच्या अपडेटनुसार, पुष्पाने २०.१४ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, सोमवार आणि मंगळवारचे कलेक्शन सुरुवातीच्या दिवसापेक्षा चांगले आहे.

‘पुष्पा’ चित्रपटाचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिल्या दिवशी ‘पुष्पा’ चित्रपटाने ३.११ कोटी, दुसऱ्या दिवशी ३.५५ कोटी, तर तिसऱ्या दिवशी ५.१८ कोटी अशाप्रकारे पहिल्या आठवड्यात एकूण ११.८४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी ४.२५ कोटी आणि पाचव्या दिवशी ४.०५ कोटी अशाप्रकारे आतापर्यंत २०.१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यानंतर आता ‘पुष्पा’ची तुलना यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-१’शी केली जात आहे. सोशल मीडियावरही अल्लू अर्जुन आणि यशचे चाहते बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवर चर्चा करण्यात व्यस्त आहेत. चला तर मग बघूया ‘केजीएफ चॅप्टर-१’ने पहिल्या ५ दिवसात किती कमाई केली.

‘केजीएफ चॅप्टर-१’ चित्रपटाचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन
पहिल्या दिवशी ‘केजीएफ चॅप्टर-१’ चित्रपटाने २.१० कोटी, दुसऱ्या दिवशी ३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ४.१० कोटी अशाप्रकारे पहिल्या आठवड्यात ९.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर चौथ्या दिवशी २.९० कोटी आणि पाचव्या दिवशी ४.३५ कोटी रुपयांची कमाई अशाप्रकारे एकूण १६.४५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

अशाप्रकारे ‘पुष्पा’ चित्रपटाने एकूण ५ दिवसात ‘केजीएफ चॅप्टर-१’ चित्रपटापेक्षा ३.६९ कोटी रुपयांची अधिक कमाई केली आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट चांगलाच आवडला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा