Saturday, April 19, 2025
Home टेलिव्हिजन धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन

धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध शो ‘भाभी जी घर पर हैं’ मधील अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. जीतू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष असून तो केवळ 19 वर्षांचा होता. आपल्या तरुण मुलाच्या निधनामुळे अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. या बातमीने मनोरंजन जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

कॉमेडियन सुनील पाल यांनी जीतू गुप्ता यांच्या मुलाच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली आहे. वास्तविक जीतू गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुलगा आयुषचा फोटो शेअर करून त्याच्या मृत्यूची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर सुनील पाल यांनीही जीतू गुप्ता यांची दुःखद पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर पुन्हा शेअर केली आणि चाहत्यांना सांगितले की, जीतू गुप्तांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या पोस्टमध्ये त्याने RIP, भाभी जी घर पर है चा अभिनेता, माझा भाऊ जीतूचा मुलगा आयुष (19 वर्ष) राहिला नाही.” असा भावूक संदेश लिहला आहे.

अभिनेता जीतू गुप्ता याने एक दिवस आधी आपल्या मुलाचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये आयुष हॉस्पिटलच्या बेडवर दिसत होता. आयुषचा हा फोटो शेअर करताना अभिनेत्याने सांगितले होते की, त्याच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही. या पोस्टमध्ये “मुलगा आयुषबद्दलची पोस्ट वाचून, तुम्हा सर्वांना त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन येत आहेत, पण हात जोडून तुम्हा लोकांना ???? फक्त तुमचे आशीर्वाद आणि देवाकडे प्रार्थना करा, कारण यावेळी त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. गंभीर, मी अजिबात बोलण्याच्या स्थितीत नाही आणि हे शक्य नाही इतके कॉल्स……’

दुःखाची गोष्ट म्हणजे जीतू गुप्ताने आपला मुलगा आता कायमचा गमावला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे अभिनेता खूप दु:खी झाला आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  जीतू गुप्ता बद्दल बोलायचे झाले तर तो भाभी जी घर पर हैं या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारताना दिसत आहे. या शोमधून त्याला विशेष ओळख आणि नाव मिळाले आहे. ‘भाभी जी घर पर हैं’ ही मालिका त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असल्याचे त्यांनी स्वतः त्यांच्या जुन्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा – टेलिव्हिजनवरील ‘या’ सोज्वळ अभिनेत्रींनी घातला ‘बिग बॉस’मध्ये धुमाकूळ, बिकिनी लूकने केले चाहत्यांना घायाळ
अरेरे! उंचीमुळे झाली अनन्या पांडेची फजिती, ‘हा तर 5G चा टॉवर’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘या’ दिग्दर्शकाच्या अत्याचाराला कंटाळून रणबीर कपूरने सोडला ‘हा’ चित्रपट, खुलासा करत मांडली व्यथा

 

हे देखील वाचा