Saturday, July 6, 2024

‘भाबी जी घर पर है’ फेम सौम्याने केले ग्लॅमरस फोटो शेअर; तर रोहिताश्व म्हणतोय, ‘तुमचा दिवस शुभ असो’

टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन आणि रोहिताश्व गौर हे दोन कलाकर आहेत, ज्यांनी ‘भाभी जी घर पर हैं’ मध्ये सर्वात जास्त काळ मनोरंजनाच्या भागाला जिवंत ठेवण्यात यश मिळवले आहे. सौम्याने शोमध्ये तिच्या कामुक साडी फॅशनने असंख्य मने जिंकली आहेत. रोहिताश्वची प्रतिभा अशी आहे की, तो एका कॉमेडियन कलाकाराप्रमाणे प्रत्येकाला सहज हसवू शकतो.

फक्त टीव्हीमध्येच नाही तर, दोघे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रचंड सक्रिय आहेत आणि ते त्यांच्या चाहत्यांशी जोडलेले आहेत. सौम्याने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत,ज्यात ती पिवळ्या रंगाची ब्रालेटवर रंगीबेरंगी ब्लेझर आणि मिडी स्कर्ट घातले आहे. यामध्ये ती दिलखुलास अंदाजात हसताना दिसत आहे. हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत.

त्याचवेळी रोहिताश्वने त्याच्या चाहत्यांना चांगल्या दिवसाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रोहिताश्व व्हिडिओमध्ये म्हणाला, “शुभ प्रभात तुम्हा सर्वांना दिवस चांगला जावो. आज सकाळी माझ्या कॉलची वेळ उशीरा आहे. माझ्या कॉलची वेळ सेटवर ९ वाजता आहे आणि प्रत्येक वेळेप्रमाणे मी सेटवर लवकर आलो आहे.” तो दररोज अनेक पर्वत मागे सोडून सेटवर पोहोचतो. ज्याचे दृश्य त्याने चाहत्यांना व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडिओमध्ये रोहिताश्वने त्याच्या सेटची संपूर्ण झलक दाखवली. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

सौम्या टंडनचं करियर
सौम्या टंडनने २००६ मध्ये टीव्ही शो ‘ऐसा देश है मेरा’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यामध्ये तिने रस्टी देओलची भूमिका साकारली. यानंतर ती ‘मेरी आवाज को मिल गई रोशनी’ मध्ये दिसली. त्यानंतर ती ‘जोर का झटका’ या रियॅलिटी शोमध्ये शाहरुख खानसोबत होस्ट म्हणून दिसली. याशिवाय, ती ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’, ‘मल्लिका-ई-किचन ऑन एअर’ आणि ‘डान्स इंडिया डान्स’ सारखे शो होस्ट करतानाही दिसली आहे. तिने २००७ मध्ये, ‘जब वी मेट’ चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

-हद्द झाली! अमायरा दस्तूरने घातली ‘अशी’ बिकिनी; नेटकरी म्हणाले, ‘यांना नग्न व्हायला…’

-राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

हे देखील वाचा