Tuesday, July 23, 2024

भगवंत मान | स्टँड अप काॅमेडियन ते आपचे CM पदाचे उमेदवार, दारूमुळे अनेकदा…

आम आदमी पार्टीने त्यांच्या पंजाबमध्ये जुन्या आणि विश्वासू अशा भगवंत मान यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच केली. भगवंत मान यांना लोकं एक कॉमेडियन म्हणून आणि राजनेता म्हणून ओळखतात. ते पंजाबच्या संगरूर लोकसभा सीटवरून दुसऱ्यांदा आम आदमी पार्टीचे आमदार म्हणून निवडून आले आहे. ते आम आदमी पार्टीचे पंजाब इकाई प्रदर्शने अध्यक्ष आहे.

आम आदमी पार्टीचे पंजाब इकाईचे मीडियामधील सल्लागार आणि माजी पत्रकार मंजीत सिंह सिद्धू हे भगवंत मान यांचे मित्र आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार भगवंत मान यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा आणि सकारत्मक पैलू म्हणजे ते त्यांची बाजू मोठ्या ठामपणे मांडतात. ते ज्या जोशाने हजारो लोकांना भाषण देतात त्याच जोशाने ३/४ लोकांशी ते बोलतात. मंजीत सिद्धू यांच्या सांगण्यानुसार भगवंत मान यांना लोकं कॉमेडियन आणि नेता म्हणून तर ओळ्खतातच मात्र ते एक उत्तम कवी देखील आहे. मात्र त्यांनी कधी त्यांच्या कवितांचे पुस्तक प्रकशित केले नाहीये.

भगवंत मान हे शिक्षण घेत असतानाच कॉमेडीच्या क्षेत्रात गेले. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी कॉमेडीच्या आणि कवितेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आणि ते व्यवसायाने कॉमेडियन झाले. त्यांच्या पहिल्या कॉमेडी आणि गाण्याचे मजेशीर व्हर्जनची पहिली कॅसेट १९९२ साली ‘गोबी दी ए कच्चिए व्यापारने’ नावाने आली आणि कॉमेडीच्या जगात प्रसिद्ध झाले. कॉमेडीमध्ये व्यस्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण मधेच सोडले. १९९२ ते २०१३ सालापर्यंत त्यांनी त्यांचे २५ कॉमेडीचा अल्बम रेकॉर्ड केले, तर त्यांनी त्यांच्या पाच गाण्यांची कॅसेट देखील प्रदर्शित केली. भगवंत मान यांनी १९९४ ते २०१५ पर्यंत १३ हिंदी चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये त्यांची कला दाखवली.

‘जुगनू’, ‘झंडा सिंह’, ‘बीबो बुआ’, ‘पप्पू पास’ आदी अनेक कॉमेडी पात्र जगाला भगवंत मान यांनीच दिले आहेत. त्यांनी जगतार जग्गी आणि राणा रणबीर यांच्यासोबत देखील कॉमेडी केली. भगवंत मान यांनी ‘जुगनू मस्त मस्त’ नावाचा टीव्ही शो आणि ‘नो लाइफ विद वाइफ’ नावाने स्टेज शो केले. भगवंत मान यांनी इंद्रजीत कौर यांच्याशी लग्न केले असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र त्यांची पत्नी मान यांच्यापासून लांब अमेरिकेत राहते, तर भगवंत मान हे त्यांच्या आईसोबत सतोज गावात राहतात.

हेही वाचा-

हे देखील वाचा