Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या भाग्यश्रीने शेअर केला नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडिओ, लिपलॉक करताना दिसले लव्हबर्ड्स

बॉलिवूडमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटामुळे सुपरस्टार ही पदवी मिळते. याच अभिनेत्रींच्या यादी सर्वात वर नाव येते ते भाग्यश्रीचे. ‘मैंने प्यार किया’ या सिनेमात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारल्यानंतर भाग्यहरी रातोरात सुपरस्टार झाली. तिला एका सिनेमामुळेच पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली. मात्र ज्या वेगाने ती या इंडस्ट्रीमध्ये आली, सुपरस्टार झाली त्याच वेगाने ती इंडस्ट्रीमधून गायब झाली. पहिल्याच सिनेमानंतर भाग्यश्रीला अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या मात्र तिने सर्व ऑफर नाकारल्या आणि लग्न करत या क्षेत्राला रामराम ठोकला.

मात्र मधली काही वर्ष चित्रपटांपासून लांब असणारी भाग्यश्री अनेक चित्रपटांमध्ये सहायक भूमिकेत दिसली आणि हळूहळू सोशल मीडियावर सक्रिय झाली. भाग्यश्री सोशल मीडियावर तुफान सक्रिय असून, ती तिचे फिटनेस व्हिडिओ, फोटो, प्रवासाचे व्हिडिओ, फोटो सतत शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक थ्रो बॅक व्हिडिओ शेअर केला असून, तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये भाग्यश्री तिच्या नवऱ्यासोबत खूपच जास्त रोमँटिक झालेली दिसली. ते दोघं कोणत्या तरी हिल स्टेशनवरील हॉटेलमध्ये दिसत असून, भाग्यश्री किचनमध्ये चहा बनवताना दिसते तिचा नवरा मागून येतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. भाग्यश्री देखील त्याला मिठी मारते आणि ते दोघं एकमेकांना किस करून चहाचा आस्वाद घेतात. हा व्हिडिओ शेअर करताना भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी अशा सकाळ खूपच मिस करत आहे. सोबत प्रवास करणे म्हणजे साईट सीन करणे नव्हे. सुट्ट्यांचा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छोटे छोटे अविस्मरणीय क्षण घालवाल.”

भाग्यश्री खूपच फिटनेस फिकर असून, ती सतत तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. ५२ वर्षांची असूनही ती ३० वर्षांची असल्याची दिसते. तिचे नेहमी फिटनेससाठी कौतुक केले जाते.

हेही वाचा :

हे देखील वाचा