Saturday, February 22, 2025
Home मराठी ‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं की, भाग्यश्री मोटेचे नाव लक्षात येते. ती सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. ती सोशल मीडिया सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोने ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिचे फोटो चाहत्यांना पुरते वेडे करून सोडतात. ती आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, जे बघता बघताच व्हायरल झाले. या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे. यात तिचे निरागसतेचे भाव झळकत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने हलक्या फिकट रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. शिवाय ती खिडकीजवळ उभी राहून फोटोसाठी पोझ देत आहे.

हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय ‘तू रंग है मेरा। नूर है तू।’ तिच्या फोटोसोबतच हे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. तसेच अल्पावधीतच या फोटोवर ३४ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

भाग्यश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘देवो के देव’, ‘सिया के राम’, ‘जोधा अकबर’ या हिंदी मालिकांमध्ये झळकली आहे. तर ‘देवयानी’, ‘प्रेम हे’, ‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय ‘काय रे रास्कला’ आणि ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली. अभिनेत्रीने ‘चिकाटी गडीलो चिथाकोतूडू’ या तेलगू चित्रपटातही काम केले आहे. आता भाग्यश्रीचे चाहते तिला हिंदी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक असतील, यात शंकाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा