Tuesday, July 9, 2024

‘मी अश्या रंगाची, मोतिया अंगाची’, फोटोमध्ये पाहायला मिळाला ‘बोल्ड’ भाग्यश्री मोटेचा मराठमोळा साज!

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच अधिक चर्चेत येते. तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो दरदिवशी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. भाग्यश्री खासकरून तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र अलीकडे ती पारंपारिक अंदाजात दिसली. तिला या अंदाजात बघून चाहते वेडे झाले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

तुम्ही तिच्या या फोटोवर एक नजर टाकली, की तुम्ही सुद्धा तिचे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत. भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या फोटोंमध्ये लाल रंगाची साडी आणि ब्लाऊज परिधान केलं आहे. सोबतच तिने दागिन्यांसह हा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, यातही तिची हॉटनेस पाहायला मिळत आहे. अभिनेत्री ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहे, तो अंदाज कोणालाही घायाळ करण्यासाठी पुरेसा आहे.

https://www.instagram.com/p/CQpwbEer3Px/?utm_source=ig_web_copy_link

या लूकमध्ये तिने एकूण दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, “मी अश्या रंगाची, मोतिया अंगाची” असं लिहिलं आहे. तिच्या परिपूर्ण लूकला हे साजेसं कॅप्शन चाहत्यांकडून पसंत केलं जात आहे. चाहत्यांसह कलाकारांनी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ऋतुजा बागवेनेही या फोटोंवर फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

https://www.instagram.com/p/CQoCR_irleA/?utm_source=ig_web_copy_link

ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही भाग्यश्रीने बऱ्याचदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा