बॉलिवूडची ५३ वर्षीय सुंदर अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, ‘राधे श्याम’ चित्रपट. ज्यामध्ये भाग्यश्रीने प्रभासच्या (Prabhas) आईची भूमिका साकारली आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानसोबत (Salman Khan) रोमान्स करणाऱ्या भाग्यश्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.
लाजताना दिसली अभिनेत्री
हा व्हिडिओ भाग्यश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलेला दिसत होता. व्हिडिओमध्ये अभिनेत्री अशा अदा दाखवत आहे, ज्या दाखवाताना ती स्वतः लाजत आहे. (bhagyashree played prabhas mother role in radhe shayam at the age of 53 actress shared sizzling romantic video)
‘या’ गाण्यावर रोमॅंटिक झाली अभिनेत्री
व्हिडिओमध्ये भाग्यश्री ‘रुस्तम’ या प्रसिद्ध चित्रपटातील एका गाण्यावर अदा दाखवताना दिसत आहे. हे गाणे आहे- ‘देखा हजारों दफा आपको.’ या गाण्यावर भाग्यश्री तिच्या स्टाईलची जादू चालवताना दिसत आहे. या गाण्यात अभिनेत्री इतकी दंग होते की, ती कॅमेऱ्यालाच फ्लाइंग किस देऊ लागते.
चाहते व्यक्त करतायेत प्रेम
हा व्हिडिओ भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर ‘Feelreel’ या कॅप्शनसह शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भाग्यश्रीला पाहून तिचे चाहते स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना काही यूजर्सनी लिहिले, “सुपर से भी टॉप.”
‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये पाहायला मिळाले कपल
बऱ्याच दिवसांनी भाग्यश्री एका टीव्ही रियॅलिटी शोमध्ये दिसत आहे. या शोचे नाव आहे ‘स्मार्ट जोडी’. या शोमध्ये भाग्यश्री पती हिमालयसोबत स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या दोघांशिवाय या शोमध्ये अनेक रिअल लाइफ कपल्स आहेत, ज्यांना अनेक टास्क पार पाडायचे आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-