भाग्यश्रीच्या पतीने मधुचंद्राच्या रातीबद्दल केला मजेशीर खुलासा, सांगितला ‘त्या’ रात्रीचा किस्सा

 प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये भाग्यश्रीच्या (Bhagyashree) नावाचा सर्वप्रथम समावेश होतो.  आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने भाग्यश्रीने या काळात प्रत्येकालाच वेड लावले होते. तिने काम केलेले चित्रपट आजही प्रसिद्ध आहेत. तिच्यासोबत काम करायला त्या काळात प्रत्येक अभिनेता उत्सुक असायचा. अभिनेत्री भाग्यश्री जितकी तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आली ती तितकीच तिच्या खासगी आणि वैवाहिक आयुष्याचीही चर्चा त्या काळात रंगली होती. भाग्यश्रीने उद्योजक हिमालय दासानीसोबत (Himalay Dassani)  विवाह करत चित्रपट जगताला रामराम ठोकला होता. तिने अलीकडेच तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल एक खुलासा केला आहे.

सध्या छोट्या पडद्यावर सर्वत्र ‘स्मार्ट जोडी’ या कार्यक्रमाची चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सहभागी जोड्यांच्या अनेक रंजक कहाण्या रोज ऐकायला मिळत असतात. या कार्यक्रमात सर्वात जास्त अभिनेत्री भाग्यश्रीने आणि तिचा पती हिमालय दासानीने  सगळ्यांचे लक्ष वेधले असून कार्यक्रमात दोघेही धमाल करताना दिसत आहेत.  सोबतच आपल्या लग्नाबद्दल दोघेही अनेक रंजक आणि मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर हिमालय दासानी यांनी आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा एक मजेशीर किस्सा सांगितला जो ऐकूण सगळेच चकित झाले होते.

कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “लग्नाच्या पहिल्या दिवशी म्हणजे मधुचंद्राच्या रात्री भाग्यश्रीने घुंघट वगेरे घेऊन माझी वाट पहात बसली असेल असे मला वाटले होते, मात्र असे काहीही झाले नाही. कारण जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा ती निवांत नाइट सूट घालुन बसली होती.” त्यांच्या या खुलाशाने सगळेच हसायला लागले होते.  दरम्यान या कार्यक्रमात पहिल्या पासूनच भाग्यश्री आणि हिमालय यांची चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमात येण्यासाठी सगळ्यात जास्त मानधनही याच जोडीने घेतले आहे. भाग्यश्री आणि हिमालय दासानी यांनी १९९० मध्ये लग्न केले होते. दोघांनीही प्रेमविवाह केल्याने त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Latest Post