Wednesday, March 11, 2026
Home कॅलेंडर ‘तो’ कोपऱ्यात सलमानला सांगत होता, ‘जेव्हा मी कॅमेरा सेट करेन, तेव्हा तू तिला पकडून किस कर.’

‘तो’ कोपऱ्यात सलमानला सांगत होता, ‘जेव्हा मी कॅमेरा सेट करेन, तेव्हा तू तिला पकडून किस कर.’

बॉलिवूडमध्ये अनेकदा स्त्री कलाकारांची फसवणूक होण्याच्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात. काही वर्षांपूर्वी बोलीवूडमध्ये #MeToo चळवळ सुरू झाली होती. अभिनेत्री तनुश्री दत्ताने या प्रकरणाला सुरुवात केली होती. यानंतर अनेक बड्या अभिनेत्यांची, निर्मात्यांची, दिग्दर्शकांची नावं या प्रकरणात समोर आली होती. परंतु याचं पुढे काय झालं कुणास ठाऊक! म्हणूनच आज काल बॉलिवूडमध्ये काम मिळवणं हे तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये असं म्हटलं जातं. असाच प्रकार एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नव्वदीच्या दशकात होता होता राहिला. कोण होती ही अभिनेत्री आणि काय होतं नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.

१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित होऊन या २९ डिसेंबर रोजी ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाद्वारे सलमान खानसोबत पदार्पण करणार्‍या भाग्यश्रीने आपल्या भोळ्या शैलीने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान सलमान आणि भाग्यश्रीची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहता त्यांना एकाचवेळी अनेक फोटोशूट्सची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी दोघांनी काही फोटोशूट्स केले देखील परंतु भाग्यश्रीने या फोटोशूट्सबाबत आता काही खुलासे केले आहेत.

जबरदस्तीने किसिंग फोटोज काढत होता फोटोग्राफर
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री म्हणाली, ‘त्या काळात एक अतिशय प्रसिद्ध फोटोग्राफर असायचा जो या जगात आता अस्तित्वात नाही. माझी आणि सलमानचे काही हॉट फोटोज घ्यायची त्याची इच्छा होती. यासाठी फोटोशूटच्या वेळी त्याने सलमानला एका कोपर्‍यात नेऊन सांगितलं होतं की, जेव्हा मी कॅमेरा सेट करेन, तेव्हा तू तिला पकडून किस कर.’

सलमानचं उत्तर ऐकून हायसं वाटलं…
भाग्यश्री पुढे म्हणते, ‘मी त्यांच्या जवळच उभी होते आणि मला सगळं काही ऐकू येतं होतं, याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती. मी त्या फोटोग्राफरने शब्द ऐकले आणि काही क्षणांसाठी स्तब्धच झाली. पण जेव्हा सलमानचे शब्द माझ्या कानावर पडले आणि माझ्या जीवात जीव आला. सलमानने फोटोग्राफरला स्पष्ट शब्दात सांगितलं की, मी असं काहीही करणार नाही. तुम्हाला जर अशी पोज हवी असेल तर तुम्हाला भाग्यश्रीशी याबद्दल बोलावं लागेल.’

‘त्यावेळी आम्ही सर्व नवोदित होतो आणि फोटोग्राफरला वाटलं की तो त्याला पाहिजे तसा तो आमचा वापर करेल. कारण त्या दिवसात किसिंग सीन्स स्क्रीनवर दाखवले जात नव्हते. पण सलमानचं हे उत्तर ऐकून मला कळालं की मी सुरक्षित वातावरणात काम करत आहे.’, असं भाग्यश्री पुढे म्हणाली.

हे देखील वाचा