Sunday, January 26, 2025
Home बॉलीवूड अंतिम चित्रपटातील ‘भाई का बड्डे’ गाण्याचा टिजर रिलीझ; पाहायला मिळणार ‘दाजी अन् मेहुण्या’ची जोडी

अंतिम चित्रपटातील ‘भाई का बड्डे’ गाण्याचा टिजर रिलीझ; पाहायला मिळणार ‘दाजी अन् मेहुण्या’ची जोडी

सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ 26 नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’ हे पहिले गाणे महिनाभरापूर्वीच प्रदर्शित झाले होते. आता नुकतेच या चित्रपटातील दुसऱ्या गाण्याचे टिझरही प्रदर्शित झाले आहे. त्या गाण्याचे बोल ‘भाई का बड्डे’ असे आहेत. या टिझरमध्ये आयुष गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. त्यामध्ये तो काही देसी मुव्हज दाखवत आहेत, तर सलमान खान पोलिसांच्या ड्रेसमध्ये धमाकेदार एन्ट्री करताना दिसत आहे. दोघेही या गाण्यात जबरदस्त रुबाबात दिसत आहेत.

‘अंतिम’ चित्रपटाचे नवीन गाणे ‘भाई का बड्डे’ एक पार्टी गाणे आहे. या गाणाच्या टिझरला खूप कमी वेळात एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून लक्षात येते की या गाण्याचा टिझर चाहत्यांना किती आवडला आहे. ‘अंतिम’ चित्रपटाचे नवीन गाणे 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या गाण्यात पुन्हा एकदा ‘दाजी आणि मेहुण्या’ची जोडी पाहायला मिळणार आहे. (bhai ka birthday song teaser salman khan and aayush sharma upcoming film antim new song bhai ka birthday has been out)

या चित्रपटात सलमान राजवीर सिंग शीख पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावतात दिसणार आहे, तर आयुष गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. चाहते दाजी आणि साल्याची जोडी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी खूप उत्साहित आहेत.

चित्रपटात त्या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील महिमा मकवाना ही मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. ती या चित्रपटात आयुषच्या विरुद्ध दिसणार आहे. मात्र, सलमानच्या विरुद्ध कोणतीही अभिनेत्री दिसणार नाही. यापूर्वीही ‘वीरगती’ आणि ‘औजार’ या चित्रपटात कोणतीही अभिनेत्री सलमानसोबत दिसली नव्हती. तसेच हा चित्रपट २६ नोव्हेंबरमध्ये रोजी प्रदर्शित होणार आहे.

हे गाणे 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गाण्याच्या प्रदर्शनावेळी, आयुष जयपूरमधील राजमंदिर येथे सिंगल-स्क्रीन थिएटरला भेट देईल, जे भारतातील सर्वात मोठ्या सिंगल-स्क्रीन थिएटरपैकी एक आहे, जिथे तो सर्व लोकांना भेटेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीला मंगळसुत्राची जाहिरात करणे पडले महागात,धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

-छळ आणि दुसरे लग्न केल्याच्या आरोपाखाली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, पत्नीने केला होता गुन्हा दाखल

-खान कुटुंबाची ‘मन्नत’ पूर्ण! अखेर २७व्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात झाले आर्यन खानचे स्वागत

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा