Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड जेव्हा सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवरून सलमान खानने केली होती थट्टा, टीकाकारांनी साधला निशाणा

जेव्हा सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवरून सलमान खानने केली होती थट्टा, टीकाकारांनी साधला निशाणा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो. जेव्हा सलमान खान ‘बिग बॉस १३’ होस्ट करत होता. त्या काळात दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा त्याचा सर्वात आवडता स्पर्धक होता. सलमान खानने अनेक वेळा टीव्हीवर सर्वांसमोर सांगितले होते की, सिद्धार्थ शुक्ला हा या शोचा प्राण आहे. ज्यामुळे हा शो आज प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानने ही त्याच्यासाठी ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली.

अशा परिस्थितीत आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सिद्धार्थ शुक्ला हॉस्पिटलमध्ये आहे आणि सलमान खान त्याची थट्टा करत आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि सलमान खान हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. तसेच सिद्धार्थ नेहमी सलमान खानला सर म्हणत होता. पण या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याचा मित्र सिद्धार्थ शुक्लाला हॉस्पिटलमध्ये पाहून खूप थट्टा करताना दिसत आहे. (Bhaijan had joked about the death of late actor Siddharth Shukla, critics said)

सलमान खान या व्हिडिओमध्ये म्हणतो की, “चाहत्यांनी तुला या गेममध्ये वाचवले आहे परंतु वरचा तुला वाचवणार नाही. प्रत्येकजण रडेल… प्रत्येकजण म्हणेल की, काहीपण म्हणा पण तो एक चांगला माणूस होता. ओरडायचा, कोणाच्या समोर येऊन बोलायचा, धक्का मारायचा, पण कुठेतरी नक्कीच दुःख आहे. काहींनी बिग बॉसमध्ये लग्न केले, काही बिग बॉसच्या आत प्रेमात पडले तर काही बिग बॉसमधून बाहेर पडले.”

ज्यावेळी सलमान खान हे सर्व काही बोलत होता, त्या वेळी सिद्धार्थ देखील सलमान खानचे बोलणं खूप एन्जॉय करत होता आणि हसत होता. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांनी या व्हिडिओला भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्रांशु गुप्ता नावाच्या युजरने लिहिले आहे की, “कोणीही कोणालाही वाईट बोलू नये, जर सरस्वती जीभेवर बसली तर गोष्ट खरी ठरते… विश्वास ठेवणारी व्यक्ती ठेवते नाही तरी सर्व काल्पनिक आहे.” या व्यतिरिक्त, एका युजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिले की, “जेव्हा हा विनोद होत होता, तेव्हा मला तो त्यावेळी अजिबात आवडला नाही. कारण त्या वेळी बिग बॉसमध्ये सिद्धार्थची तब्येत खूपच खराब होती.”

सिद्धार्थचे पार्थिव शुक्रवारी मुंबईतील ब्रह्माकुमारीज केंद्रात नेण्यात आले होते. तेथेच त्याचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टीव्हीशी संबंधित अनेक स्टार्स आणि सिद्धार्थचे सर्व मित्र तेथे उपस्थित होते. जिथे प्रत्येकजण त्याची आई आणि त्याची कथित मैत्रीण शहनाजला भेटले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा